अबब! बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत, 1 लाख लोकांची राहण्याची व्यवस्था; मिळणार या सुविधा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:16 IST2025-01-31T19:00:52+5:302025-01-31T19:16:02+5:30

Jeddah Tower: सौदी अरेबियात तब्बल 1 किलोमीटर उंच अन् 157 मजली इमारत उभारली जात आहे.

World’s Tallest Building: सौदी अरेबियाच्या किंगडम होल्डिंग कंपनीने (KHC) जेद्दाह टॉवरचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. जेद्दाह टॉवरचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ते जगातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत बनेल.

रिपोर्ट्सनुसार, सौदी अरेबियात बांधली जाणारी ही इमारत बुर्ज खलिफापेक्षाही उंच असेल. या टॉवरमध्ये एकावेळी 1 एक लाख लोक राहू शकतील. या इमारती उंची 1,000 मीटर (1 किलोमीटर) असेल. बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे. 2028 पर्यंत इमारत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जेद्दाह टॉवरमध्ये 157 मजले असतील. ज्यात लक्झरी अपार्टमेंट, फोर सीझन हॉटेल, ऑफिस स्पेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जगातील सर्वात उंच निरीक्षण डेकचा समावेश असेल.

उंचीशी संबंधित अभियांत्रिकी आव्हाने लक्षात घेऊन या इमारतीची रचना केली गेली आहे. त्याच्या बांधकामाची जबाबदारी जेद्दा इकॉनॉमिक कंपनीकडे आहे, जी प्रसिद्ध वास्तुविशारद एड्रियन स्मिथ आणि गॉर्डन गिल यांच्यासोबत काम करते.

सौदी व्हिजन 2030 अंतर्गत आर्थिक विकास आणि शहरी विकास लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारला जात आहे. त्याच्या बांधकामामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून भविष्यात ते देशासाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनेल.

हा प्रकल्प 2013 मध्ये सुरू झाला असला तरी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे तो 2018 मध्ये थांबला होता. यानंतर, ऑक्टोबर 2024 मध्ये सौदी बिन लादीन ग्रुपला $1.92 अब्ज रुपयांचा नवीन करार देण्यात आला, त्यानंतर पुन्हा काम सुरू झाले.

आता दर चार दिवसांनी एक मजला पूर्ण करण्याच्या योजनेवर बांधकाम पथक काम करत आहे, जेणेकरून इमारत निर्धारित वेळेत पूर्ण करता येईल.