Jenny The Arabian mare goes on a walk alone every day for 14 years
गेल्या १४ वर्षांपासून रोज एकटी फिरायला निघते 'ही' घोडी, म्हणते 'मी पळून नाही आले'.. By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 11:43 AM2019-04-20T11:43:17+5:302019-04-20T11:48:04+5:30Join usJoin usNext सकाळी सकाळी फिरायला जाण्याची अनेकांना सवय असते. ही रोजचीच बाब आहे. यात नवीन काहीच नाही. लोक त्यांच्या दिनचर्येनुसार बाराही महिने मॉर्निंग वॉकला जातात. पण एखादं जनावर आपल्या मालकाविना रोज मॉर्निंग वॉकला जात असेल तर याला काय म्हणाल? जर्मनीच्या फेचनहेम जिल्ह्यात जेनी नावाची एक अरबी घोडी गेल्या १४ वर्षांपासून एकटीच बाहेर फिरायला निघते. ती रोज सकाळी फ्रेंकफर्टच्या रस्त्यांवर फिरायला निघते. आजूबाजूच्या लोकांनाही आता या गोष्टीची सवय झाली आहे. जेनी अनोळखी लोकांसाठी गळ्यात एक कार्ड बांधते. ज्यावर लिहिले आहे की, 'माझं नाव जेनी आणि मी पळालेली नाही. केवळ फिरायला बाहेर पडली आहे. धन्यवाद'. ती शहरात एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आहे आणि सगळेजण तिला बघण्यासाठी वाट बघत असतात. जेनी गेल्या १४ वर्षांपासून एकटीच बाहेर फिरायला निघते कारण तिचा मालक वर्नर वीशेडेल ७९ वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे ते आता जेनीवर स्वार होऊ शकत नाहीत. पण रोज वीशेडेल रोज त्यांचा दरवाजा उघडतात आणि जेनी ओळखीच्या रस्त्यांवर फिरायला निघते. जेनी रोज दुपारच्या जेवणाआधी कमीत कमी ८ वेळा फिरते. जेनीच्या मालकानुसार, ती जेवणाच्या वेळेवर घरात परत येते. स्थानिक लोक रोज जेनीला बघण्यासाठी गर्दी करतात. तर काही लोकांना जेनीला एकटं रस्त्यांवर फिरताना पाहून चिंताही करतात आणि पोलिसांना फोनही करतात. पण यावर पोलीस सांगतात की, जेनी गेल्या १४ वर्षांपासून रस्त्यावर फिरत आहे आणि तिच्याकडून कुणाला काही त्रास झाला नाही. वेयशेडेल पोलिसांसोबत संपर्कात असतो जेणेकरुन जेनी आणि नागरिक सुरक्षित राहतील. ट्राम स्टेशन आणि वेगवेगळ्या ठिकाणी जेनीचे चाहते आहे. ड्रायव्हर सुद्धा जेनीच्या ओळखीचे झाले आहेत. टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटकेSocial ViralJara hatke