आजही 'या' किल्ल्यात दडला आहे सोन्या-चांदीचा खजिना, पण अजून कुणालाच सापडला नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:22 IST2025-01-29T14:05:38+5:302025-01-29T14:22:01+5:30
Junagarh fort : या किल्ल्यात अजूनही सोन्या-चांदीचा खजिना आहे. या किल्ल्यावर दुश्मनांनी अनेकदा हल्ले केले, पण ते किल्ल्यात शिरू शकले नाहीत.

Junagarh Fort: भारताचा इतिहास खूप जुना आणि मोठा आहे. भारताला किल्ल्यांचा देशही म्हटलं जातं. आजही अनेक शेकडो वर्ष जुने किल्ले दिमाखात उभे आहेत. खासकरून राजस्थानमधील किल्ल्यांची स्थिती खूप चांगली आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक हे किल्ले बघायला येतात. या किल्ल्यांचा इतिहासही खूप रोमांचक असतो. अशाच एका किल्ल्याची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किल्ला म्हणजे बीकानेरचा जूनागढ किल्ला. या किल्ल्यात ९ महाल आहेत आणि असं सांगितलं जातं की, या किल्ल्यात अजूनही सोन्या-चांदीचा खजिना आहे. या किल्ल्यावर दुश्मनांनी अनेकदा हल्ले केले, पण ते किल्ल्यात शिरू शकले नाहीत.
हा किल्ला अकबरच्या शासन काळात रायसिंह महाराजांनी १६४५ मध्ये बांधला. किल्ल्याच्या चारही बाजूने दरी आहेत. तर किल्ला बनवण्यासाठी लाल दगडाचा वापर करण्यात आला आहे. महाराजांनी राजधानी सुरक्षित करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. हा किल्ला बनवताना अशा टेक्निकचा वापर करण्यात आला होता की, या किल्ल्यात उन्हाळ्यातही थंडावा जाणवतो.
किल्ल्याच्या आत अनेक गुप्त मार्ग आणि अनेक भुयार आहेत. किल्ल्याची सुरक्षा पाहता बीकानेरमध्ये जेवढेही शासक होऊन गेले त्यांनी किल्ल्यातच आपले महाल बांधले.
जूनागढ किल्ल्यात अनूप महाल, सरदार महाल, जोरावर महाल, कर्ण महाल, रायसिंह महाल, गंगा निवास, रतन निवास, सुजान निवास आणि कोठी डूंगर निवास बांधले आहेत. सुरूवातीला जूनागढ किल्ल्याला चिंतामणी किल्ला किंवा बीकानेर किल्ला म्हटलं जात होतं.
जूनागढ किल्ल्यातील खजिन्याचं रहस्य अजूनही उलगडलं जाऊ शकलं नाही. काही वर्षाआधी या किल्ल्याच्या दरी सोन्याचे अनेक बिस्कीट सापडले होते. स्थानिक लोकांनुसार महाराजांनी किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात खजिना लपवून ठेवला आहे. जो आजही किल्ल्यात दडला आहे.
या किल्ल्यात एक प्लेनही आहे. जे ब्रिटीश सेनेने पहिल्या महायुद्धात वापरलं होतं. इंग्रजांनी हे प्लेन महाराजा गंगा सिंह यांना गिफ्ट केलं होतं. जूनागढ किल्ला बघण्यासाठी ५० रूपयांची तिकीट काढावी लागते. विद्यार्थ्यांना २० रूपये डिस्काऊंट आहे. तर परदेशी लोकांना ३०० रूपयांचं तिकीट काढवं लागतं.