७ वर्षाचा असूनही विमान उडवतो हा मुलगा, जगभरातील लोक झाले हैराण.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 02:33 PM 2020-12-29T14:33:58+5:30 2020-12-29T14:41:50+5:30
७ वर्षांच्या या मुलाचं नाव आहे ग्राहम शेमा. सध्या ग्राहमची सगळीकडे चर्चा होत आहे. सगळेजण त्याचं कौतुक करत आहेत. कारणंही तसंच आहे. इतक्या कमी वयात त्याने प्लेन उडवायला शिकवलं. जर माणसात इच्छाशक्ती असेल तर सगळंच केलं जाऊ शकतं. मग व्यक्तीचं वय कितीही असो. म्हणूनच ज्या वयात मुलं खेळण्यातील विमान मागतात, त्या वयात या सात वर्षांच्या मुलाने तीन वेळा खरंखुरं विमान उडवलं आहे. त्याचा हा कारनामा पाहून स्वत: जर्मनीच्या राजदूतांनी त्याला भेटायला बोलवलं आहे. त्याला विमान उडवताना बघितल्यावर त्याला वाटतं की, तो गेली अनेक वर्षे विमान चालवतो. या मुलाला त्याच्या जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे पायलट होण्याची प्रेरणा मिळाली. चला जाणून घेऊ त्याबाबत काही....
युगांडा हा तसा तर उपासमार आणि गरिबीमुळे जगभरात ओळखला जातो. पण इथे टॅलेंटचीही कमतरता नाही. आफ्रिकी महाद्वीपाच्या या छोट्याशा देशात राहणाऱ्या ७ वर्षीय मुलाला तुम्ही भेटाल तर त्याच्या गोष्टी ऐकून हैराण व्हाल.
७ वर्षांच्या या मुलाचं नाव आहे ग्राहम शेमा. सध्या ग्राहमची सगळीकडे चर्चा होत आहे. सगळेजण त्याचं कौतुक करत आहेत. कारणंही तसंच आहे. इतक्या कमी वयात त्याने प्लेन उडवायला शिकवलं.
आतापर्यंत तीनवेळा विमान उडवून त्याने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. मीडियावाल्यांनी त्याला हाउस कॅप्टन अशी उपाधी दिली आहे.
ग्राहमला मॅथ्स आणि सायन्समध्ये फार इंटरेस्ट आहे. त्याला पुढे जाऊन एक पायलट आणि एस्ट्रोनॉट व्हायचं आहे. ग्राहमला मंगळावर जाऊन काम करायचं आहे. त्याचा रोल मॉडल एलन मस्क आहे.
विमान उडवण्याचा विचार ग्राहमच्या डोक्यात तेव्हा आला जेव्हा तो त्याच्या दादीच्या घरी होता. पोलिसांचं एक हेलिकॉप्टर जवळून उडत होतं. या हेलिकॉप्टरमुळे त्याच्या घराचं छप्पर उडालं होतं. यानंतर त्याने प्लेनबाबत माहिती मिळवणं सुरू केलं.
ग्राहमच्या आईने त्याची एडमिशन एव्हिएशन अकॅडमीत केलं. त्यानंतर केवळ पाच महिन्यात पहिल्यांदाच विमान उडवलं. आतापर्यंत त्याने तीनवेळा सेसना १७२ उडवलं आहे.