घटस्फोटानंतर ती बनली ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत, कोण आहे ही सौंदर्यवती? घ्या जाणून.... By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:07 PM 2021-10-10T19:07:12+5:30 2021-10-10T19:33:05+5:30
मिस यूके आणि मिस वर्ल्ड रनर अप असणारी क्रिस्टी बर्टरेली (Kirsty Bertarelli) वयाच्या ५०व्या वर्षी पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने अलीकडेच तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे आणि नक्कीच हा डिव्होर्स सर्वसामान्य नाही आहे. सौंदर्य, प्रसिद्धी आणि श्रीमंत एकाच वेळी मिळणं तशी भाग्याची गोष्ट आहे. असंच काहीसं भाग्य ब्रिटनची ब्यूटी क्वीन क्रिस्टी बर्टरेली (Kirsty Bertarelli) हिला मिळालं आहे. पतीपासून वेगळं झाल्यानंतर तिला आणखी एका कारणामुळे जगभरातून प्रसिद्धी मिळत आहे.
क्रिस्टीने घेतलेला घटस्फोट हा साधासुधा (Divorce Settlement) नव्हता. यासाठी करण्यात आलेली सेटलमेंटही (£350million Divorce Settlement) मोठी होती. या सेटलमेंटनंतर तिला पतीकडून मिळालेल्या संपत्तीनंतर क्रिस्टी ब्रिटनच्या महाराणीपेक्षाही श्रीमंत झाली आहे.
५० वर्षीय क्रिस्टीने तिच्या अब्जाधीश पती अर्नेस्टो (Ernesto) कडून लग्नाच्या २१ वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.
क्रिस्टीला पोटगी म्हणून जी संपत्ती मिळाली आहे त्यानंतर ती ब्रिटनच्या महाराणीपेक्षाही जास्त श्रीमंत झाली आहे.
यानंतर तिची संपत्ती प्रसिद्ध पॉप सिंगर एड शिरीन (£220million), सर मिक जॅगर (£310million) आणि एडेल (£140million) यांच्यापेक्षा जास्त झाली आहे.
क्रिस्टी आणि अर्नेस्ट यांनी याच वर्षी जुलैमध्ये लग्नाचा 20वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांनी यावेळी काढलेले कपल फोटोज देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.
Daily Mail ने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा घटस्फोट अतिशन शांतपणे झाला.
क्रिस्टी आधीपासून £52च्या एका शानदार मॅन्शनमध्ये जिनीव्हा याठिकाणी राहत आहे. घटस्फोटात £350 मिलियन मिळाल्यानंतर तिची संपत्ती £400 मिलियन झाली आहे.
ब्रिटनच्या महाराणीची संपत्ती £360 मिलियन आहे.
क्रिस्टीचे पती अर्नेस्टो स्वित्झरलँडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हे कपल हॉलिडेसाठी ज्या सुपरयाटमधून जात असे त्याच्या इंधनासाठीचा खर्च २५ हजार डॉलर आहे.
क्रिस्टीचे पती अर्नेस्टो स्विस फार्मास्यूटिकल टायकून म्हणून ओळखले जातात. या घटस्फोटानंतर क्रिस्टी सर्वात श्रीमंत घटस्फोटित महिला बनली आहे.