कोरोनापेक्षाही महाभयंकर होती, ११० वर्षापूर्वी आलेली 'ही' महामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:34 PM2020-04-20T18:34:50+5:302020-04-20T18:48:51+5:30

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारतासह अनेक देशात लॉकडाऊन केल आहे. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जगभरात कोरोनाच्या महामारीमुळे भीतीचे वातावरण तयार झालं आहे. अशीच परिस्थिती ११० वर्षांपूर्वी सुद्धा होती.

त्यावेळी आलेल्या प्लेगच्या महामारीने सुरूवातीलाच ६० हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला होता. नंतर हा आकडा लाखांवर पोहोचला या महामारीच्या वेळी म्हणजेच १९११ मध्ये चीनच्या मदतीला अमेरीका, जपान, रुस आणि युरोपीय देश आले होते.

हा आजार एका उंदराप्रमाणे असलेल्या प्राण्यामुळे पसरला होता. या प्राण्याची शिकार करण्यासाठी त्या काळात खूप पैसे मोजावे लागत होते.

हा आजार एका उंदराप्रमाणे असलेल्या प्राण्यामुळे पसरला होता. या प्राण्याची शिकार करण्यासाठी त्या काळात खूप पैसे मोजावे लागत होते. परदेशातील लोक बंजारी लोकांकडून या प्राण्याची शिकार करून घेत होते. या प्राण्यांमध्ये असलेला आजार मांजरींपर्यंत पोहोचला आणि पसरत गेला. या आजाराला मंचुरियन प्लेगच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं

त्यावेळी हार्बीन आंतराराष्ट्रीय शहर होते. या ठिकाणी रुसी, जपानी, युरोपीय आणि अमेरिकन नागरिक राहत होते. त्यामुळे ही महामारी जगभरात पसरत गेली.

प्लेगची साथ घेऊन येणाऱ्या उंदरांसोबत माणसेही पटापट प्राण टाकत आणि भलीभली गावे उजाड होत. प्लेगच्या धसक्यानेच अशी अनेक गावं बकाल झाली.

१९१० च्या शेवटच्या महिन्यात ही महामारी पसरायला सुरूवात झाली.

सुरुवातीपासूनच या आजारात मृत्यूदर जास्त होता. सामुहिक मृतदेह दफन करण्याचे आदेश देण्यात आले होते.

चीनचं सरकार त्यावेळी कोरोनापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत होतं. पोस्टमार्टम करून हा आजार प्लेगचा असल्याचा शोध लावण्यात आला होता. त्यामुळे संक्रमित व्यक्तीच्या फुप्फुसांवर परिणाम होत होता. प्लेगच्या आजारांमुळे लोकसंख्या अर्धी झाली होती.

१९११ च्या शेवटी हार्बीनमध्ये प्लेगच्या महामारीपासून मुक्त करण्यात यंत्रणेला यश आलं होतं. चीनच्या या महामारीने आणि शेनयांग सम्मेलनामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली होती.