know about spacex first commercial spaceship built for astronauts
परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 07:52 PM2019-03-05T19:52:50+5:302019-03-05T19:56:21+5:30Join usJoin usNext स्पेस एक्सनं अंतराळात सफर करू शकणारं एक रॉकेट सोडलं होतं. हे रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं. या रॉकेट अंतराळ सफरीचं सर्वसामान्यांचं स्वप्न लवकरच साकार होईल. स्पेस एक्सनं यशस्वीपणे अंतराळ सफर केली. मात्र यावेळी त्यात कोणीही नव्हतं. चाचणी घेतली जात असल्यानं एक डमी बसवण्यात आला होता. स्पेस एक्सनं या रॉकेटला ड्रॅगन नाव दिलं होतं. या रॉकेटनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचं अंतर अतिशय सुखरुपपणे कापलं. त्यामुळे येत्या काळात अंतराळ यात्रा हा मोठा व्यवसाय ठरू शकतो. स्पेस एक्सकडून नासाच्या योजनेच्या अंतर्गत यंदाच्या उन्हाळ्यात दोन जणांना अंतराळ यात्रेवर पाठवलं जाऊ शकतं. स्पेस एक्सनं ड्रॅगनमध्ये सेन्सर लावले आहेत. अंतराळ यात्रेदरम्यान माणसाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याची नोंद सेन्सरमध्ये घेतली जाईल. स्पेस एक्सनं ड्रॅगनमध्ये बसवलेल्या डमीला रिपली असं नाव दिलं आहे. एलियनवरील एका चित्रपटात रिपली नावाचं एक पात्र होतं. स्पेस एक्सचं मुख्यालय कॅलिफॉर्नियात आहे. टॅग्स :नासाNASA