Know the books which banned in india
जाणून घ्या कोणती आहेत ती ८ पुस्तकं जी भारतात आहेत बॅन By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 03:53 PM2019-12-17T15:53:51+5:302019-12-17T16:11:30+5:30Join usJoin usNext द हिंदुज - अॅन अल्टरनेटीव्ह हिस्ट्री- पेंगुईन इंडिया मार्फत हे पुस्तक बॅन करण्यात आलं होते. ही पुस्तक बंद होण्यामागचा इतिहास मोठा आहे. यावेळी अनेक पुस्तकांना बंदी घालण्यात आली होती. द सैटनिक वर्सेज-विसाव्या शतकातील सगळ्यात जास्त वादात असलेले पुस्तक म्हणजे सलमान रुश्दी यांचे द सैटनिक वर्सेज या पुस्तकाने जागतीक स्तरावरील वादाला तोंड फोडले होते. या पुस्तकात इस्लाम धर्माचा अपमान करण्यात आला होता असं स्पष्टीकरण देण्यात आले होते. एन एरीया ऑफ डार्कनेस- वी,एस नॉयपॉलच्या एन एरीया ऑफ डार्कनेस या पुस्तकाला १९६४ मध्ये भारत सरकारने प्रतिबंध केला. नॉयपॉल यांनी या पुस्तकातून सामाजीक आणि आर्थिक प्रगतीच्या मुद्द्यांवर आधारीत प्रश्न उपस्थित केले होते. नेहरू अ पॉलिटीकल बॉयोग्राफी -देशाच्या पहिल्या पंतप्रधानांवर आधारीत मायकल ब्रिचर याने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर १९७५ मध्ये बंदी घालण्यात आली. नाईन अवर्स टु रामा- अमेरिकन लेखक स्टैनले वोलपर्ट याच्या नाईन अवर्स टु रामा या पुस्तकाला १९६२ मध्ये बंदी घालण्यात आली होती. या पुस्तकात स्टैनले याने गांधी आणि गोडसे यांच्या हत्येच्या वेळी शेवटच्या नऊ तासात काय काय घडले हे मांडले होते. तसंच स्टैनले या लेखकाने जिन्ना यांच्यावर सुध्दा पुस्तक लिहिेले होते. आणि ते पुस्तक पाकिस्तानात बॅन करण्यात आले होते. द फेस ऑफ मदर इंडिया- अमेरिकेचे इतिाहासकार कैथरीन याने १९७२ मध्ये द फेस ऑफ मदर इंडीया हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर राजकीय वादविवाद घडून आले. महात्मा गांधीनी ह्या पुस्तकाला रिपोर्ट ऑफ ड्रेन इन्सपेक्टर हे नाव दिले होते. द लोटस अॅण्ड रोबोट -आर्थर कोस्टलरने १९६० साली हे पुस्तक लिहिले आणि प्रकाशित केल्या केल्या या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. या पुस्तकात भारत आणि जपान यांच्या धार्मिकतेबाबत लिखाण केले होते. द ट्रू फुरकान- १९९० मध्ये अस सफी आणि अल महदी यांनी हे पुस्तक लिहिेलं या पुस्तकामुळे संपूर्ण जगात वादंग निर्माण झाला. २००५ साली हे पुस्तकाला भारतात प्रतिबंध करण्यात आला.टॅग्स :जरा हटकेJara hatke