शाब्बास! पोरानं कचऱ्यापासून बनवले ६०० ड्रोन; थेट DRDO नं दिली नोकरी? वाचा फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:49 PM2020-07-09T12:49:43+5:302020-07-09T13:53:38+5:30

एक चांगली कल्पना तुमचं आयुष्य बदलू शकते. हे वाक्य तुम्ही अनेकदा सिनेमात किंवा जाहिरातीत ऐकलं असेल. पण प्रत्यक्षात सुद्धा असं होतं. कर्नाटकच्या एनएम प्रताप या मुलाबद्दल आम्ही सांगत आहोत. सध्या कर्नाटकातील हा मुलगा खूप चर्चेत आहे. प्रतापने तब्बल ६०० ड्रोन तयार केले आहेत.

रिपोर्टनुसार प्रतापने ई वेस्ट म्हणजेच इलेक्टॉनिक कचऱ्यापासून एका दोन नाही तर ६०० ड्रोन तयार केले आहेत. हवेत उडून आपल्याला हवी तशी छायाचित्र आणि व्हिडीओ मिळवण्यसाठी ड्रोनचा वापर करता येऊ शकतो. स्थानिक आमदार आणि खासदारांडून प्रतापच्या कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मैसूरमधील जेएसएस कॉलेजमधून गॅज्यूएशन पूर्ण केलेल्या प्रतापने १४ वर्षाच्या वयात ड्रोन तयार करण्याचा विचार केला होता. तब्बल ८० वेळा केलेले प्रयत्नांना अपयश आल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी प्रतापने पहिला ड्रोन तयार केला. ई कचऱ्यापासून तयार केलेल्या या ड्रोनचा वापर फोटो काढण्यासाठी केला जात होता.

आपले ड्रोन मॉडेल घेऊन जेव्हा प्रताप IIT Delhi ला पोहोचला तेव्हा त्याला पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर जपानच्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याची वाट मोकळी झाली. डिसेंबर २०१७ मध्ये प्रताापने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले. प्रतापचे कौशल्य ओळखून जपानच्या नोबेल विजेत्या हिडेकी शिराकावा यांनी त्याला आपल्या घरी बोलावून कौतुक केले.

जेव्हा कर्नाटातील काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. तेव्हा ड्रोनच्या साहाय्याने गरजू लोकांची मदत करण्यात आली होती. आईआईटीमध्येप्रवेश केल्यानंतर प्रतापने ८७ देशांमध्ये ड्रोनचे प्रदर्शन केले. २०१८ मध्ये जर्मनीमध्ये अलबर्ट आईस्टीन इनोवेशनचे गोल्ड मेडल ही मिळवले. टोक्योच्या रोबोटीक्स प्रदर्शनात प्रतापला गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळाले.

सोशल मीडियावर प्रतापला DRDO ने काम दिल्याच्या अनेक अफवा पसरत आहेत. माध्यमांनी केलेल्या पाठपुराव्यात असं दिसून आलं की, प्रतापला पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातून कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. कारण पंतप्रधानांकडून DRD मध्ये नियुक्ती केली जात नाही.

पण सोशल मीडियावर मात्र अफवांना उधाण आले आहे.

(image credit: better india, .edexlive.com.)