Know the man who done this big eye paintings
आकर्षक मोठ्या डोळ्यांची चित्रकला पाहून व्हाल अवाक्, कशी काढली आहेत चित्र नक्की बघा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 02:52 PM2019-12-15T14:52:52+5:302019-12-15T15:22:23+5:30Join usJoin usNext भोपाळमधील स्वराजविधी या आर्ट गॅलेरीत मंजुनाथ माने या चित्रकाराचे मानवी डोळे या थिमवर आधारीत असलेल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मंजुनाथ माने यांच्या चित्रकलेच्या प्रदर्शनाची सुरूवात कर्नाटक येथून झाली. कर्नाटक सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ कन्नड़ अॅण्ड कल्चर यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात मंजुनाथ माने यांची १२ चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनातील एका चित्रात कर्नाटकच्या ग्रामीण भागातील लोकांची वेशभूषा, तसेच महिलांचे शृंगार करण्याच्या पारंपारीक पध्दती दिसून येतात. दसरा असताना म्हैसूर मधील हम्पी मंदिरात जमलेले लोकं आणि त्यांचा उत्साह या चित्रातून दिसून येतो. या सगळ्या चित्रांमध्ये वेगवगळ्या रंगांचा वापर केला आहे. पण या चित्रांमध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आहेत ते म्हणजे चित्रात रेखाटलेल्या माणसांचे डोळे. ही चित्र फारच मोठी आहेत, त्यात वेगवेगळे प्रसंग मांडले आहेत. या चित्रांमधल्या मोठ्या डोळ्यांमागचे कारण सांगताना मंजुनाथ सांगतात की माझे स्वतःचे डोळे लहानपणापासूनच खूप मोठे आहेत. लहानपणापासून मला प्रत्येक व्यक्ती माझ्या डोळ्यांबद्दल विचारत असत. असं मंजुनाथ चित्रांबद्दल बोलताना म्हणाले. डोळे सुध्दा व्यक्तीमत्त्वातील महत्वाचा भाग असतो, काही प्रेमळ तर काही रागीट चित्र पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे डोळे मोठे रेखाटत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्र पाहणाऱ्याचे व्हिजन हे मोठे असावे म्हणून त्यांनी मोठ्या डोळ्यांचे चित्र काढायचा संकल्प केला. टॅग्स :जरा हटकेJara hatke