'या' तलावात दडला आहे अब्जो रूपयांचा खजिना, समोर दिसतो पण काढता येत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 09:59 AM2020-03-21T09:59:58+5:302020-03-21T10:05:08+5:30

हा अनोखा आणि प्रसिद्ध तलाव हिमाचल प्रदेशातील मण्डी जिल्ह्यापासून 60 किलोमीटर दूर रोहांडाच्या घनदाट जंगलांमध्ये आहे. या तलावाला कमरूनाग तलाव म्हणून ओळखलं जातं.

आजपर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या खजिन्यांबाबतचे किस्से-कथा ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अनेकदा हे खजिने जमिनीच्या पोटात असतात तर अनेकदा यांचा शोध समुद्राच्या तळात घेतला जातो.

पण कधी तुम्ही अशा तलावाबाबत ऐकलंय का ज्यात अब्जो रूपयांचा खजिना आहे? जर ऐकलं किंवा वाचलं नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्या तलावाबाबत सांगणार आहोत.

हा अनोखा आणि प्रसिद्ध तलाव हिमाचल प्रदेशातील मण्डी जिल्ह्यापासून 60 किलोमीटर दूर रोहांडाच्या घनदाट जंगलांमध्ये आहे. या तलावाला कमरूनाग तलाव म्हणून ओळखलं जातं.

असे म्हणतात की, या तलावात फार पूर्वीपासून अब्जो रूपयांचा खजिना दडलेला आहे. पण आजपर्यंत कुणीही हा खजिना काढण्याची हिंमत करू शकलेलं नाही. याचंही कारणही आश्चर्यजनक आहे.

इथे एक फार प्रसिद्ध मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच हा कमरूनाग तलाव आहे. असे मानले जाते की, जे भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात ते या तलावात सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे टाकतात.

या तलावात सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे टाकण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आहे. या प्रथेच्या आधारावरच असं मानलं जातं की, या तलावात आतापर्यंत अब्जो रूपयांचा खजिना जमा झाला असेल.

असेही मानले जाते की, तलावातील हा खजिना देवांचा आहे. काही मान्यतांनुसार, या तलावाची रक्षा एक मोठा साप करतो. जे कुणी या तलावातील धन काढण्याचा प्रयत्न करतो त्याला साप मारतो.

या सापाच्या भीतीमुळेच आजपर्यंत या तलावातील एक पैशालाही कुणी हात लावू शकलं नाही किंवा चोरी करू शकलं नाही.

लोकांमध्ये अशीही मान्यता आहे की, हा तलाव थेट पाताळात जाते आणि त्यामुळे या तलावात उतरण्याची कुणी हिंमत करत नाही.

इथे जे लोक येतात ते मनोकामना घेऊन येतात आणि देव त्यांची ही मनोकामना पूर्ण करतात. हे लोक पुन्हा येऊन या तलावात सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतात.