बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास... By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:24 PM 2020-07-01T12:24:11+5:30 2020-07-01T12:49:44+5:30
सिडनीची अल्बर्ट टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी ही बस सेवा चालवत होती. ही बस सेवा साधारण 1973 पर्यंत सुरू होती. त्यानंतर बंद झाली. या प्रवासाचा रूटही फार रोमांचक होता. सिडनीची अल्बर्ट टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी ही बस सेवा चालवत होती. ही बस सेवा साधारण 1973 पर्यंत सुरू होती. त्यानंतर बंद झाली. या प्रवासाचा रूटही फार रोमांचक होता.
ही बस सेवा 1972 मध्ये कोलकाता ते लंडन जाण्याचं तिकिट 145 पाउंड घेत होती. पण नंतर हे भाडं वाढलं. या भाड्यात बसचं भाडं, जेवण, नाश्ता आणि रस्त्यात हॉटेलमध्ये थांबण्याची सुविधा राहत होती
भारतातून निघणारी ही बस लंडनला पोहोचेपर्यंत अनेक देशांमधून जात होती. रस्त्यात ही बस अनेक ठिकाणी थांबत होती. कुठे फिरण्यासारखं स्थळ असेल तर टूर कंपनी प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबवत होती.
महत्वाची बाब म्हणजे या बसने मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. या बसची सुरूवात व्हायची कोलकातामधून. त्यानंतर दिल्ली, काबूल, तेहरान, इस्तांबूल मार्गे ही बस लंडनला पोहचत असे. लंडनहून पुन्हा ही बस याच मार्गाने परत येत होती.
या प्रवासाचा प्लॅन असा केला जात होता की, याला 45 दिवस लागायचे. बस प्रवासात मधे प्रवाशांचा प्रवास आरामदायक व्हावा म्हणून थांबत होती. म्हणजे रस्त्यात एखादं पर्यटन स्थळ आलं तर प्रवाशांना फिरण्याची संधी मिळत होती. (Image Credit : highroadforoz.blogspot.com)
ही बस सेवा 1972 मध्ये कोलकाता ते लंडन जाण्याचं तिकिट 145 पाउंड घेत होती. पण नंतर हे भाडं वाढलं. या भाड्यात बसचं भाडं, जेवण, नाश्ता आणि रस्त्यात हॉटेलमध्ये थांबण्याची सुविधा राहत होती
ही फोटोत दिसणारी बस प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणांहून घेऊन एका डबल डेकर बसजवळ पोहोचत होती. या बसला अल्बर्ट बस नावाने ओळखलं जात होतं. (Image Credit : highroadforoz.blogspot.com)
बसमध्ये प्रवाशांना स्लिपींग बर्थची सुविधा मिळत होती. तसेच खिडकीतून ते बाहेरील नजाराही बघू शकत होते. बसमध्ये सलून, पुस्तक वाचण्याची जागा आणि बाहेरील नजारा बघण्यासाठी एक खास बाल्कनी सुद्धा होती. (Image Credit : highroadforoz.blogspot.com)
हे बसचं नंतरचं तिकीट आहे. तेव्हा या बसचं तिकीट वाढून 305 डॉलर झालं होतं. बसच्या तिकीटावर असंही लिहिलं होतं की, जर भारत आणि पाकिस्तानमधील बॉर्डर बंद असतील तर प्रवाशांना पाकिस्तानवरून विमानाने नेलं जाईल. असं झालं तर भाडं वाढेल. काही असो पण या बसचा प्रवास नक्कीच यादगार होत असेल. (Image Credit : highroadforoz.blogspot.com)