बोंबला! आता केसांचे पण ख्रिसमस ट्रीज् बनवतात लोक, स्टाईल बघून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:04 PM2019-12-25T15:04:07+5:302019-12-25T15:12:47+5:30

सोशल मिडीयावर सध्याच्या काळात वेगवेगळे चॅलेन्जेस तसंच फोटो हटके स्टाईल मध्ये दिसून येतात. ख्रिसमस सुरू झाल्यामुळे ख्रिसमसची थीम घेऊन सोशल मिडियावर लोकं वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

कोणी आपल्या कपड्यावर तर कोणी आपल्या केसांवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच यामध्ये मुलींनी आपल्या केसांचा वापर करून ख्रिसमस ट्री तयार केलेला आहे.

हा ख्रिसमस ट्री पाहून तुम्ही अवाक् व्हाल.अतिशय आकर्षक अशी केशभूषा करून ख्रिसमस ट्री तयार केला आहे.

सोशल मिडीयावर या अनोख्या स्टाईलची चर्चा खूप रंगली आहे तसंच या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. यासाठी मुलींनी रिबन, स्टार, बेल्स यांचा खूप क्रीएटिव्ह वापर केला आहे.

केसांचा ख्रिसमस ट्री पाहून तुम्ही चकित होत असाल तरी यावरून दिसून येत की हा ख्रिसमस ट्री आपल्या केसांवर साकारलेल्या लोकांचे या सणावर किती प्रेम आहे ते दिसून येते. हा ट्रेंड २०१६ मध्ये सुरू झाला.

हा सण साजरा करण्याचे प्रकार वेगवेगळे असले तरी हे लोक आपल्या सणाला कसं आनंदपूर्ण साजरा करता येईल यासाठी प्रयत्न करत असतात.