'या' बेटावरील ज्वालामुखीचा कधीही होऊ शकतो उद्रेक, रोज जीव मुठीत घेऊन झोपतात येथील १७० लोक..... By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 03:20 PM 2021-02-02T15:20:50+5:30 2021-02-02T15:32:56+5:30
या सुंदर बेटावर केवळ १७० लोक राहतात. हे सर्व लोक इतर लोकांप्रमाणेच आपला दिवस घालवतात. पण रोज त्यांच्या मनात एक भीती असते. ती भीती आहे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची भीती. आओगाशिमा अस या सुंदर बेटाचं नाव आहे. हे बेट केवळ ८.७५ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. जपानची राजधानी टोकियोपासून हे बेट ३५८ किलोमीटर अंतरावर आहे. फिलीपीन समुद्राच्या मधोमध असलेल्या या बेटावर जिवंत ज्वालामुखी आहे. ज्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो.
या सुंदर बेटावर केवळ १७० लोक राहतात. हे सर्व लोक इतर लोकांप्रमाणेच आपला दिवस घालवतात. पण रोज त्यांच्या मनात एक भीती असते. ती भीती आहे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची भीती.
या बेटाचं नैसर्गिक पर्यटकांना याकडे आकर्षित करतं. या बेटाची आणखी एक खास बाब आहे. ती म्हणजे जर आकाश साफ असेल तर येथून आकाशगंगा म्हणजे मिल्की वे गॅलक्सी स्पष्टपणे दिसते. पण हा नजारा लवकर बघायला मिळत नाही.
या बेटावरील ज्वालामुखीबाबत सांगायचं तर याची उंची ३.५ किलोमीटर आहे आणि रूंदी २.५५ किलोमीटर. तसा तर अखेरचा या ज्वालामुखीचा उद्रेक १७८१ ते ८५ दरम्यान झाला होता. पण हा ज्वालामुखी अॅक्टिव मानला जातो.
जुलै १७८० मध्ये इथे एक भूकंप आला होता. याच धक्क्यांमुळे ज्वालामुखीचे क्रेटर्स फुटले होते आणि त्यातून लाव्हारस बाहेर येऊ लागला होता. याच्या तीन वर्षांनी इथे पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यावेळी ६३ लोक बेट सोडून गेले होते.
तेच १७८५ मध्ये या बेटावर एक स्फोट झाला होता त्यात १४० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जे लोक वाचले ते आजही तिथेच राहतात. आतापर्यंत हे समजू शकलं नाही की, या बेटावर हे लोक कधीपासून राहतात.
या बेटावरील लोक भीतीच्या सावटाखाली जगतात. त्यांच्या लाइफस्टाईलवर ज्वालामुखीचा मोठा प्रभाव आहे. या बेटावरील लोक ज्वालामुखीच्या वाफेवर भाज्या-फळं शिजवून खातात.
असे सांगितले जाते की, १६५२ मध्ये हे बेट लोकांच्या नजरेस पडलं होतं. तेव्हा पहिल्यांदा हे बेट चर्चेत आलं होतं. या बेटाची कोणतेही अधिकृत कागदपत्रे नाहीत ना इतिहास आहे.