काय सांगता राव! पठ्ठ्यानं लग्नाच्या पत्रिकेसह घरोघरी पाठवली दारूची बाटली अन्...; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 11:44 AM2020-12-20T11:44:35+5:302020-12-20T11:55:27+5:30

Viral Trending News in Marathi : या पत्रिकेचा पूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रातल्या एका लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नाच्या पत्रिकेसह अक्षता देणं किंवा काही भेटवस्तू देणं याबाबत तुम्ही ऐकून असाल. पण लग्नाच्या पत्रिकेत दारूची बाटली आणि चखना दिला जातोय असं तुम्ही कधी ऐकलंय का? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. लग्नाची पत्रिका उघडल्यानंतर आता आश्चर्यकारक भेटवस्तू समोर आली आहे.

या पत्रिकेच्या आत एक दारूची बाटली, चखना आणि मिनरल वॉटर ठेवलं आहे. ही घटना महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील आहे. या पत्रिकेच्या पहिल्या पानावर गणपती बाप्पाचा फोटो आहे. दुसऱ्या पानावर लग्नाची तारीख, स्थळ आणि इतर तपशील आहेत.

त्यानंतरच्या पानावर जे आहे ते पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. या पत्रिकेचा पूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विशेष म्हणजे ही घटना अशा जिल्ह्याची आहे. ज्या ठिकाणी दारूबंदी आहे. या व्हिडीओ समोर आल्यानंतर दारूबंदीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लोक या घटनेवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्स करत आहे.

आजतकने दिलेल्या माहितीनुसार ही पत्रिका छापलेल्या माणसाला विचारल्यास त्यांनी सांगितले की, ''ही माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. हे लग्न चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये झाले. दारूबंदीमुळे या पत्रिका चंद्रपूर जिल्ह्यात वाटता आलेल्या नाहीत.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''चंद्रपूरात अशा पत्रिका वाटण्यात आलेल्या नाही. नागपूरातील काही खास नातेवाईकांना या प्रकारच्या पत्रिका वाटण्यात आल्या होत्या. त्यापैकीच काहीजणांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. चंद्रपुरात पत्रिकेसह ड्रायफ्रुट्स वाटण्यात आले होते.'' यादरम्यान त्यांनी ड्रायफ्रुट्स असलेल्या पत्रिकासुद्धा दाखवल्या होत्या.

लोक म्हणतात की, सहसा लग्नाच्या कार्डात शुभ चिन्हे म्हणून तांदळाचे दाणे आणि हळद कुंकू लावून आमंत्रण दिले जाते, परंतु या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ जो व्हायरल होत आहे त्या सर्व गोष्टी समजण्या पलीकडे आहे.

हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून काही जणांनी या व्हिडीओला मस्करीत घेतलं असून अनेकांनी दारूच्या बाटल्या पत्रिकेसह दिल्या म्हणून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.