lockdown effect in mumbai seen peacock in mumbai parasi colony area myb
लॉकडाऊनने दाखवलं मुंबईचं अविस्मरणीय रुप, मायानगरीत घडलं मोरांचं दर्शन.... By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:08 PM2020-04-03T13:08:01+5:302020-04-03T13:36:26+5:30Join usJoin usNext कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सगळयाच नागरीकांना घरी बसण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. रस्त्यावर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही वाहनं नाही. त्यामुळे सामसुम वातावरण आहे. अशी शांत सामसुम मुंबई तुम्ही या आधी कधीही पाहिली नसेल.नेहमीच माणसांनी गजबजलेली मुंबई सध्या शांत झाली आहे. अशा परिस्थीत निर्सग आपलं वेगळचं रुप सगळ्यांनाच दाखवत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. पण मुंबईच्या रस्त्यांवर चक्क मोर दृष्टीस पडले आहेत. आज आम्ही त्याच मोरांचे फोटो तुम्हाला दाखवणार आहोत. मुंबईतल्या रतन टाटा इन्सिटट्यूट, बाबुलनाथ मंदीराजवळ, पारशी कॉलनी या परिसरात आज मोरांच दर्शन घडून आलं आहे. हे नयनरम्य दृश्य मनाला आनंद देणारं आहे. मोठ्या संख्येनं मोर दिसण्याचा हा क्षण कदाचित पहिल्यांदाच आला असेल. सक्तीनं लावलेल्या या लॉकडाउननं आज मुंबईकरांना सुखद धक्का दिला. इतकंच नाही तर सध्या मुंबईमध्ये सकाळच्या वेळी पक्ष्यांचे आवाज ऐकाला मिळत आहेत. मुंबईचं हे सुंदर रुप तुम्ही या आधी कधीही पाहिले नसतील. सर्वत्र शांततापूर्ण वातावरण आहे.टॅग्स :जरा हटकेकोरोना वायरस बातम्याट्रॅव्हल टिप्सJara hatkecorona virusTravel Tips