जेव्हा भारतातील एक राजा स्पेनमधील कॅब्रे डान्सरच्या प्रेमात पडतो, कहाणी पूर्ण फिल्मी आहे By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 03:52 PM 2021-10-02T15:52:22+5:30 2021-10-02T16:01:58+5:30
ते तिच्याकडे इतके आकर्षित झाले की, त्यांची झोप उडाली होती. अनेक अडचणींचा दूर करत महाराजांनी तिच्यासोबत लग्न केलं. ते कसं आणि कशी एक स्पेनची कॅबरे डान्सर कपूरथलाची महाराणी झाली हे जाणून घेऊन.... भारतात अनेक महाराजे आणि त्यांच्या राण्यांचे वेगवेगळे किस्से प्रसिद्ध आहेत. राजघरण्यातील लोक त्यांचं लाइफ कसे जगत होते हे वाचून लोक हैराण होतात. असाच एक किस्सा कपूरथलाचे महाराज जगतजीत सिंग यांचाही आहे. त्यांचं एक स्पेनमधील कॅबरे डान्सवर प्रेम जडलं. ते तिच्याकडे इतके आकर्षित झाले की, त्यांची झोप उडाली होती. अनेक अडचणींचा दूर करत महाराजांनी तिच्यासोबत लग्न केलं. ते कसं आणि कशी एक स्पेनची कॅबरे डान्सर कपूरथलाची महाराणी झाली हे जाणून घेऊन....
कपूरथलाचे महाराजा जगतजीत सिंग यांनी स्पेनच्या सुंदर अनिता डेलगाडोसोबत लग्न केलं तेव्हा त्यांचं लग्न देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. 1906 मध्ये राजा स्पेनच्या सुंदरीच्या प्रेमात पडला होता. राजा आणि अनिताची भेट स्पेनमधील वार्षिक जत्रेत झाली होती. तिथे अनिता एक कॅबरे डान्सर बनून आली होती. जगतजीत सिंग यांना तेथील राजांनी बोलावलं होतं.
महाजारांनी आधीच अनिताच्या सुंदरतेची चर्चा ऐकली होती. जेव्हा अनिता डान्स करत होती तेव्हा महाराज एकटक तिच्याकडे बघत राहिले होते. ते तिच्यावर डान्सवर आणि तिच्यावर भाळले होते. दिवान जरमनी दास यांनी त्यांच्या पुस्तकात हा किस्सा सविस्तर लिहिला आहे. तसेच जेव्हिअर मोरो यांनीबी त्यांच्या पुस्तकात अनिताबाबत लिहिले आहे.
महाराज जगतजील सिंग हे अनिताचा डान्स पाहून मोहित झाले होते. डान्सनंतर महाराज आणि अनिताची भेट झाली. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एका दिवस महाराजांनी बिनधास्तपणे अनिताकडे प्रेम व्यक्त केलं. अनिताही त्यांच्या प्रेमात पडली होती.
जेव्हा महाराजांनी लग्नासाठी प्रस्ताव ठेवला तेव्हा अनिता म्हणाली की, तिला वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. महाराज स्वत: अनितासोबत तिच्या घरी गेले. पण तिच्या वडिलांनी भेटण्यास नकार दिला. अनिताचे वडील स्पेनच्या रस्त्यावर उकडलेले बटाटे विकत होते. घराचा जास्त भार अनितावर होता. त्यामुळे अनिताने लग्न करून परदेशात जावं असं त्यांना वाटत नव्हतं.
अनिताचे वडील महाराजांची एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. आता महाराजांनी मोठी रक्कम असलेला चेक तिच्या वडिलांना दिला. आता ते नकार देऊ शकले नाही. यावेळी अनिताच्या वडिलांनी विचारले की, महाराजांना आणखी पत्नी आहेत का? महाराजांनी हो असं सांगितलं. पण ते हेही म्हणाले की, त्यातील अनितासारखी सुंदर कुणीच नाही. नंतर अनिताचे वडील पुन्हा अडले. पण अनिताने त्यांना समजावलं की, ती महाराजांवर प्रेम करते.
नंतर दोघांचं लग्न झालं. ती महालात येऊन महाराणी झाली. तिचं नाव बदलून महाराणी प्रेम कौर साहिबा ठेवण्यात आलं. महाराजांना तिच्याकडून एक मुलगा झाला, ज्याचं नाव अजीत सिंह होतं. अनिता इतकी सुंदर होती की, मॅ़ड्रिडचे प्रसिद्ध पेंटर ज्यूलियो रोमेरो आणि रिकार्डो बारोजा यांनी तिला मॉडेल होण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तिने तो नाकारला.
काही वर्षांनी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. राजाचं मन तिच्यावरून उठलं. महाराजांनी सातवं लग्न केलं तेव्हा अनिता स्पेनला परत गेली आणि दोघे वेगळे झाले. नंतर ती गुप्तपणे सेक्रेटरीसोबत पॅरिसमध्ये राहू लागली. महाराजांनी तिला खूप धन दिलं. ती कपूरथलाहून जे दागिने घेऊन गेली होती त्यांची किंमत कोट्यवधी होती. नंतर अनिताचं 7 जुलै 1962 मध्ये निधन झालं.