जेव्हा किम जोंग पडला होता चीअरलीडरच्या प्रेमात, रहस्यमय हुकूमशहाची अशीही अनोखी लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:59 PM2020-04-22T14:59:53+5:302020-04-22T15:35:57+5:30

हुकूमशहाला सुद्धा मन असतं आणि ते सुद्धा प्रेमात पडू शकतात हे यातून दिसून येतं. किम जोंग उनने एका तरूणीचं गाणं ऑर्केस्ट्रात ऐकलं होतं.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा शासक किम जोंग उन हा त्याच्या नुकत्या झालेल्या कथित कार्डिओवस्कुलर सर्जरीमुळे चर्चेत आलाय. मात्र, अशी काही सर्जरी झाल्याची अधिकृत माहिती उत्तर कोरियाने दिलेली नाही. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा किम जोंगच्या रहस्यमय जीवनाची चर्चा होऊ लागली आहे. खासकरून त्याच्या लव्हस्टोरीची चर्चा होत आहे. (Image Credit : nypost.com)

किम जोंग उन याची लव्हस्टोरीही अनोखी आहे. हुकूमशहाला सुद्धा मन असतं आणि ते सुद्धा प्रेमात पडू शकतात हे यातून दिसून येतं. किम जोंग उनने एका तरूणीचं गाणं ऑर्केस्ट्रात ऐकलं होतं.

जेव्हा त्या तरूणीसोबत त्याची भेट करून देण्यात आली तेव्हा त्याचं तिच्यावर मन जडलं. आश्चर्याची बाब म्हणजे ही तरूणी कधीकाळी चीअरलीडरही होती.

ही लव्हस्टोरी खास यासाठी आहे कारण किमचे वडील आणि आजोबा यांनी अनेक लग्ने केली होती. त्यांनी अनेक बायका ठेवल्याही होत्या. पण किम याबाबतीत फार वेगळा निघाला. त्याने एकच लग्न केलं.

मीडिया रिपोर्टनुसार 2009 मध्ये त्यांचं लग्न झालं. दोघांची केमिस्ट्री पाहून अनेक एक्सपर्ट्स मानतात की, ते दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत.

किमने ऑर्केस्ट्रामधे एका तरूणीचं गाणं ऐकलं आणि तिच्या प्रेमात पडला. नंतर ती तरूणी उत्तर कोरिया फर्स्ट लेडी झाली. या तरूणीचं नाव आहे रि सोल जू. आता दोघांच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत आणि असेही सांगितले जाते की, त्यांना 3 अपत्ये आहेत.

2008 आधी किम जोंग उन वडील प्योंगयांगमधे वडिलांसोबत राहत होता. तो वडिलांच्या चौथ्या पत्नीचा मुलगा आहे. तरी सुद्धा वडिलांनी किमला उत्तराधिकारी निवडण्याची तयारी सुरू केली होती. याचं कारण त्यांच्या वडिलांना आलेला हार्ट अटॅक हेही होतं.

असेही मानले जाते की, किम वंशात हार्ट अटॅकची समस्या जीवघेणी आहे. किम जोंगचे वडिलच नाही तर आजोबा सुद्धा हार्ट अटॅक आणि ओव्हरवर्कने गेले होते.

रि सोलचे वडील उत्तर कोरियात प्राध्यापक होते आणि तिची आई डॉक्टर. ती एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आली होती. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यावर ती चीनमध्ये संगीत शिकण्यासाठी गेली होती.

ती शाळा आणि कॉलेजमधे वेगवेगळ्या अॅक्टिविटीमधे भाग घेत होती. त्यानुसार दक्षिण कोरियात 2005 मधे होणाऱ्या एशियन एथलेटिक चॅम्पियनशिपसाठी उत्तर कोरियात चीअरलीडर निवडल्या जात होत्या. त्यात रि सोल ची सुद्धा निवड झाली.

तिथून आल्यावर ती अभ्यासात बिझी झाली. ती इतकं चांगलं गात होती की, देशातील सर्वात लोकप्रिय ऑर्केस्ट्रा ट्रूपमध्ये तिला संधी मिळाली. अनेक देशांमध्ये त्यांचे शो होत होते. ती देशातील लोकप्रिय गायिका झाली होती. पुढे 2009 मध्ये किम जोंग आणि रि सोल यांचं लग्न झालं. एका वर्षात त्यांना पहिला मुलगा झाल्याची माहिती आहे.