कोट्यावधी रूपयांचं घर अन् आलिशान याट, सौदीच्या प्रिन्स सलमानची लाइफस्टाईल पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:54 PM2021-10-12T12:54:10+5:302021-10-12T13:20:17+5:30

Mohammad Bin Salman Al Saud : प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने २०१९ मध्ये एक लक्झरी याटही खरेदी केलं होतं. त्याची किंमत ३६० कोटी रूपयांच्या आसपास आहे. सलमान नेहमीच आपल्या मित्रांसोबत याच याटवर नाइट लाइफचं आनंद घेतो.

जगात अब्जाधीशांची कमतरता नाही. जगभरात असे अनेक लोक सापडतील जे त्यांच्या लक्झऱी लाइफस्टाईलसाठी दररोजज कोट्यावधी रूपये खर्च करतात. यातीलच एक आहे सौदीचा अरबचा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल साउद. ३६ वर्षीय प्रिन्स सौदी अरबचा क्राउन प्रिन्स आहे. सोबतच तो सौदी अरबचा उपराष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रीही आहे. सध्या त्याचे ८५ वर्षी वडील सलमन बिन अब्दुलअजीज अल सौदी अरबचे किंग आहेत.

प्रिन्स सलमान बराच शिकलेला आहे. त्याने रियाद येथील किंग सौदी यूनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट केलं. प्रिन्स सलमानने २००८ मध्ये सारा बिन्त मशौर अल सौदीसोबत लग्नही केलं होतं. त्यांना २ मुली आणि ३ मुलं आहेत.

सौदी अरबच्या शाही परिवाराची एकूण संपत्ती ८६ लाख कोटी रूपयांच्या आसपास सांगितली जाते. जर केवळ प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौदीच्य संपत्तीबाबत सांगायचं तर ती २१४ अब्ज रूपयाच्या आसपास आहे. त्यामुळे प्रिन्स मोहम्मद सलमानला रॉयल लाइफ जीवन पसंत हे. प्रिन्स सलमान आपल्या बेहिशेब खर्चांसाठी आणि लक्झरी लाइफसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

प्रिन्स सलमानला महागड्या आणि लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस, बुगाटी, लॅम्बॉर्गिनी, बेंटले आणि फरारीसारख्या अनेक आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची देखभाल करण्यासाठी प्रिन्स दर महिन्याला लाखो रूपये खर्च करतो.

प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने २०१९ मध्ये एक लक्झरी याटही खरेदी केलं होतं. त्याची किंमत ३६० कोटी रूपयांच्या आसपास आहे. सलमान नेहमीच आपल्या मित्रांसोबत याच याटवर नाइट लाइफचं आनंद घेतो.

प्रिन्स सलमान आपल्या बर्थ-डे पार्टीवरही मोठा खर्च करतो. काही वर्षाआधी त्याने एका बर्थडे पार्टीसाठी ५६ कोटी रूपये खर्च केले होते. या पार्टीत हॉलिवूड सिंगर पिट बुल, जे-लो आणि शकीरासारख्या मोठ्या सेलिब्रिटी आल्या होत्या. या पार्टीत जगभरात खास लोक आले होते.

२०१५ मध्ये प्रिन्स सलमानने गमती-गमतीत ५७ एकर परिसरात असलेला एक आलिशान बंगला खरेदी केला होता. आज या बंगल्याची किंमत १०० कोटी रूपये आहे. तो या बंगल्यात कधी कधी जातो. पण या बंगल्याची देखरेख करण्यासाठी दर महिन्याला कोट्यावधी रूपये खर्च होतात.

सौदी अरबचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानची प्रतिमा महिलांच्या अधिकारासाठी बोलणाऱ्या व्यक्तीची आहे. सौदी अरबमध्ये महिलांना त्यांच्या मर्जीने त्यांचं नाव बदलण्याचा आणि देशातील महिलांना ड्रायव्हिंगचा अधिकार देण्याचं काम प्रिन्स सलमान यानेच केलं. त्यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. ज्यानुसार, सौदी अरबचे नागरिक आता पाकिस्तान, बांग्लादेश, चाड आणि म्यानमारच्या महिलांसोबत सरकारी सहमतीशिवाय लग्न करू शकणार नाहीत.

प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याला महागड्या पेंटींग्स खरेदी करण्याची फार आवड आहे. प्रिन्स सलमान याने काही वर्षाआधी एक पेंटीग खरेदी करण्यासाठी ४५ कोटी रूपये खर्च केले होते.