Madhya pradesh mandsaur disabled teachers ideal poor children home education
कौतुकास्पद! ध्येयवेड्या दिव्यांग शिक्षकानं दिला आधार; घरोघरी जाऊन गोरगरीब मुलांना देताहेत शिक्षणाचे धडे By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:32 PM2020-08-28T14:32:09+5:302020-08-28T14:37:07+5:30Join usJoin usNext कोरोना काळात जसा मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. त्याचप्रमाणे शिक्षकांनाही अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. पण काही शिक्षक असे आहेत. त्यांनी आपल्या कामावर लॉकडाऊनचा प्रभाव न पडू देता आपलं काम सुरू ठेवलं आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एका सरकारी शाळेतील शिक्षकांच्या कामामुळे सर्वचजण प्रभावित झाले आहेत. या शिक्षकानं आपल्या शिकवण्याच्या कामात खंड न पडू देता घरोघरी जाऊन गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू ठेवलं आहे. मंदसौर येथील सरकारी शाळेत कार्यरत असलेला दिव्यांग शिक्षक गेल्या एक महिन्यापासून मुलांना शिक्षण देत आहे. शिक्षण देण्यासाठी शाळा बंद असल्यानं घरोघरी जाऊन शिक्षण देण्याचा मार्ग निवडला आहे. कोरोनामुळे मुलांची शाळा बंद असली तरीही त्यांचा अभ्यास यामुळे व्यवस्थित सुरू आहे रामेश्वर नागरिया नावाच्या या शिक्षकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवराज सिंग यांनी स्वतः ट्वीट करून कौतुक केलं आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर नागिरया सर नेहमी त्यांना शिकवतात. त्यामुळे शाळा बंद असल्याची उणीव भासत नाही. तर महिला मजूर भूली बाई यांनी सांगितले की, ''शाळा बंद आहेत. तरीही माझ्या मुलांचा अभ्यास रोज व्यवस्थित सुरू आहे. विशेष म्हणजे सरांच्या पायाचा त्रास असूनही ते रोज मुलांच्या शिक्षणासाठी घरोघरी जात आहेत. '' लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्यानंतर शासनानं ७ जुलैपासून 'अपना घर अपना विद्यालय' या अंतर्गत मुलांना घरी अभ्यास करण्याचे आदेश दिले. अशा स्थितीत एका दिव्यांग शिक्षकानं इमानदारी आणि निष्ठेनं रोज मुलांना शिकवण्याचं काम सुरू ठेवलं आहे. ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नव्हते अशा मुलांना शिक्षण देण्याची रामेश्वर यांची इच्छा होती. कोरोनामुळे शिक्षक आणि विद्यार्थी याच्यांतील संवाद पूर्णपणे कमी झाला. अशा स्थितीत ऑनलाईन शिक्षणं घेणं ज्या मुलांना शक्य नाही अशा मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास रामेश्वर यांनी घेतला आहे. रामेश्वर आपली मोटारसायकल घेऊन गावागावात पोहोचतात. स्वतःच्या पायाला त्रास असतानाही घरोघरी पोहोचून मुलांना शिकवण्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं आहे. यातील अधिकाअधिक मुलं ही गरीबघरातील आहेत. रामेश्वर, चंदरपूरा, खिलचिपुरा ,जगतपुरा या भागातील मुलांना शिक्षण देण्याचे काम रामेश्वर करतात. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटकेSocial ViralJara hatke