Man Walks Down London Street in Nothing But only wearing Mask
'तो' फक्त आणि फक्त मास्क लावून घराबाहेर पडला, रस्त्यावर फिरला अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:49 PM2020-07-26T15:49:58+5:302020-07-26T15:53:32+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. जगात आतापर्यंत दीड कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा साडे सहा लाखांच्या आसपास पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जगातल्या अनेक देशांनी लॉकडाऊन केला. मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थांना मोठा धक्का बसला. एका बाजूला आरोग्य सेवांवरील खर्च वाढत जात असताना तिजोरी मात्र रिकामी होत असल्यानं देशांच्या अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या. अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं वाढू लागल्यानं अनेक देशांनी लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करत काही नियमांसह दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्कचा वापर यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं या दृष्टीनं जगभरातले देश आणि तिथल्या यंत्रणा काम करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नियम पाळण्याचा आग्रह होत असताना लंडनमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. लंडनमधल्या सुप्रसिद्ध ऑक्सफर्ड रस्त्यावर एक व्यक्ती फेस मास्क लावून फिरताना आढळून आली. या व्यक्तीनं केवळ फेस मास्कच लावला होता. त्यातही तो तोंडावर लावलेला नव्हता. त्यानं गुप्तांग झाकण्यासाठी मास्क लावला होता. त्या व्यतिरिक्त त्याच्या शरीरावर कपडे नव्हते. ही व्यक्ती रस्त्यावर अगदी सहजपणे चालत होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं या व्यक्तीचा फोटो ट्विटरवर शेअर केला. सिमॉन डॉसन नावाच्या फोटोजर्नलिस्टनं हा फोटो टिपला. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा, मास्क लावण्याचा आग्रह धरला जात आहे. अनेक ठिकाणी गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जादेखील उडत आहे. लंडनमध्ये मात्र एका व्यक्ती केवळ आणि केवळ मास्कच लावून बाहेर पडल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. मात्र ही व्यक्ती अगदी आरामात रस्त्यावर फिरत होती. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus