IIM ने प्रवेश नाकारला म्हणून त्याने थाटला चहाचा स्टॉल, आता हा 'MBA चायवाला' म्हणून प्रसिद्ध By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:12 PM 2021-10-13T19:12:46+5:30 2021-10-13T19:51:56+5:30
अपयशी झाल्यावर यशाच्या वेगळ्या वाटा शोधणं गरजेचं असतं. धारमधील लबरावदाच्या प्रफुल्ल बिलोरीची गोष्ट हे सिद्ध करते. त्याला इंडियन इन्स्टिट्यु ऑफ मॅनेजमेंट या नामांकित संस्थेतून MBA करायचं होतं, परंतु त्याला प्रवेश न मिळाल्यामुळं त्याने चक्क चहाचा स्टॉल लावत आपला उद्योग थाटला...आज त्यानं उभारलेला MBA चायवाला हा ब्रँड विदेशात जायच्या तयारीत आहे...जाणून घ्या प्रफुल्लची प्रेरणादायी कथा चहाचा स्टॉल उघडणारा प्रफुल्ल बिल्लौरे हा साधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याचे वडिल शेती करतात. प्रफुल्ल हा आपल्या शिक्षणासाठी अहमदाबादला आला होता.
प्रफुल्लला IIM मध्ये काही प्रवेश मिळाला नाही, शिक्षणासाठी त्याला जे पैसे मिळायचे त्यातून त्याने IIM अहमदाबाद समोरच एक चहाचा स्टॉल लावला.
सुरुवातीला त्याने त्या स्टॉलचं नाव मिस्टर बिल्लौरे ठेवलं. त्यावेळी लोकांनी त्याची चेष्टा केली होती. इतकंच काय तर दुसऱ्या चहावाल्यांनी त्याने दुकान थाटू नये यासाठी प्रफुल्लला मारहाणही केली होती.
त्यानंतर प्रफुल्लने आपल्या दुकानाचं नाव बदलून एमबीए (MBA) चहावाला ठेवलं. आता त्याचं दुकानं MBA चहावाला म्हणूनच प्रसिद्ध आहे.आता त्याचे दिवस बदलले असून तो इंग्रजीही शिकला आहे.
आता MBA चहावाला हा एक मोठा ब्रँड बनला आहे. प्रफुल्लचा उद्योग हा देशातील २२ मोठ्या शहरांमध्ये पसरला आहे.
त्यामुळं आता त्याची हा स्टॉल विदेशातही खोलण्याची तयारी आहे. या यशासाठी त्याला त्याच्या कुटुंबियांकडून मोठी मदत झाली होती.
प्रफुल्लचे वडिल सोहन बिल्लौरे हे धारमध्ये पुजासाठी लागणाऱ्या सामानाचं दुकान लावतात. त्यांचं म्हणणं आहे की प्रफुल्ल लहानपणापासूनच हुशार होता.
त्याने इतर ठिकाणी शिक्षण घेताना वेगवेगळ्या ठिकाणी छोटंमोठं काम केलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्याला सतत सहकार्य केल्याचं त्याचे वडिल सांगतात.
प्रफुल्ल बिल्लौरेच्या MBA चहावाला या दुकानाचं रूपांतर देशातील मोठ्या ब्रँडमध्ये झालं आहे. तरूणांईमध्येही या ब्रँडची पार क्रेझ आहे.
कोणतंही काम इमानदारीनं केलं तर त्यात यश मिळतं, असं प्रफुल्लचं म्हणणं आहे.