३ वर्षांपासून एका आयलॅंडवर राहतं हे कपल, बसमधील अनोखं घर बघण्यासाठी लागते लोकांची लाइन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:29 PM2021-04-01T16:29:52+5:302021-04-01T16:41:50+5:30

टिमने आधी एक Tiffany Van खरेदी केली. हे एकप्रकारे चाकांवरील घर असतं. ही त्यांनी ७० हजार डॉलरमध्ये खरेदी केली. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ५१ लाख रूपये इतकी होते.

चांगलं जीवन जगण्यासाठी लोकांच्या मोजक्या पद्धती ठरलेल्या असतात. पण काही लोकांनी तोचतोचपणा सोडून आणखीन वेगळं जीवन जगण्याचं ठरवलं. ते त्यांना जे वाटतं तसं ते करतात. असंच एक कपल आहे. टिम अमेरिकेचा राहणारा आहे. सर्वांनाच माहीत आहे की, अमेरिकेत किती धावपळ असते. टिम डेविडसनने शांततेच्या शोधात चक्क एक आयलॅंड खरेदी केलं.

टिमने आधी एक Tiffany Van खरेदी केली. हे एकप्रकारे चाकांवरील घर असतं. ही त्यांनी ७० हजार डॉलरमध्ये खरेदी केली. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ५१ लाख रूपये इतकी होते.

टिम एक मिनिमिलिस्ट विचाराचा माणूस आहे. म्हणजे कमी वस्तूंसोबत जगण्यावर त्याचा जास्त विश्वास आहे. या व्हॅनलाच त्याने आपलं घर बनवलं. यात त्याची पत्नी सॅमने त्याला मदत केली.

या व्हॅनमध्ये ३०० स्क्वेअर फूट जागा आहे. यातच किचन, लिविंग स्पेस आणि वर्क स्पेस आहे. यानंतर ते एका खास जागेच्या शोधात निघाले. जिथे ते त्यांचं हे छोटंसं घर घेऊन जाऊ शकतील.

नंतर त्यांना फ्लोरिडामध्ये एक आयलॅंड आवडलं. हे आयलॅंड त्यांना दोन लाख डॉलरमध्ये खरेदी केलं. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १ कोटी ४६ लाख रूपये इतकी होते.

हे घरत इतकं सेफ आहे की, त्यांनी यात पूर्ण लॉकडाऊन घालवला. सोबतच हे घर कुठेही घेऊन जाता येतं. सोबतच त्यांनी आयलॅंडवरच आणखी एक घर तयार केलं. ते घर ते कमी पैशात प्रवास करणाऱ्या लोकांना रहायला देतात.

टिमचं घर बघण्यासाठी लोक दुरदुरून येतात. घर बघण्यासाठी लाइन लागते. घराचं डिझाइन पाहून लोक अवाक् होतात. गेल्या तीन वर्षांपासून दोघेही या आयलॅंडवर राहतात.