Meet A Japanese Couple Who Wears Matching Outfits Daily
सेम टू सेम! 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 03:10 PM2018-11-16T15:10:11+5:302018-11-16T15:48:29+5:30Join usJoin usNext लग्नानंतर प्रत्येक जोडप्यामध्ये एक गोड आणि अतूट नातं असतं. एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेण्यासोबतच नात्यात मोकळेपणा आणण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा आपण लहान मुलं मॅचिंग कपडे घालतात हे पाहतो. मात्र जपानमध्ये एक असं जोडपं आहे जे गेल्या 38 वर्षापासून मॅचिंग कपडे परिधान करतं. Tsuyoshi आणि Tomi Seki अशी या जोडप्याची नावं असून इन्स्टाग्रामवर ते त्यांच्या मॅचिंग कपड्यांमुळे लोकप्रिय आहेत. 1980 मध्ये या जोडप्याने लग्न केलं तेव्हापासून 38 वर्षे रोज हे जोडपं एकाच रंगाचे सुंदर कपडे परिधान करतात. इन्स्टाग्रामवर Bonpon511 या नावाने त्यांना ओळखलं जातं. Bon हे पतीचं नाव तर Pon हे पत्नीचं नाव आहे. 511 (1980.5.11) ही त्यांच्या लग्नाची तारीख आहे. केवळ कपडेच नाही तर या जोडप्याच्या आवडी-निवडी, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्याच आहेत. दोघांनाही डार्क चॉकलेट खूप आवडतं. लग्नाला खूप वर्ष झाली असली त्यांच्यातील प्रेम टिकून आहे. मॅचिंग कपडे घालण्याची या जोडप्याची स्टाईल सर्वांनाच आवडली आहे. टॅग्स :जपानलग्नJapanmarriage