meet the man who lives with 400 reptiles
अजब छंद! घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 10:46 AM2018-09-21T10:46:53+5:302018-09-21T11:45:36+5:30Join usJoin usNext प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी एक छंद असतो. काहींना वेगवेगळी नाणी जमवायला आवडतात तर काहींना पुस्तक वाचायला आवडतं. पण फ्रान्समध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्यांना सरपटणारे प्राणी पाळण्याचा अजब छंद आहे. फिलिप जिलेट असं या व्यक्तीचं नाव असून त्यांच्याकडे 50 किलोच्या कासवापासून 7 फुटांच्या मगरीपर्यंतचे तब्बल 400 सरपटणारे प्राणी आहेत. सापाला पाहताच अनेकांना भीती वाटते. मात्र फिलिप यांची गोष्टच वेगळी आहे. कारण ते क्रोब्रासह कॉफी टेबलवर मजा करत कॉफी पितात. फिलिप या सर्व घातक प्राण्यांसोबत अगदी आनंदाने राहतात. त्याच्या लिव्हिंग रुममध्ये जगातील सर्वात विषारी मानला जाणारा कोब्रा आहे. कोब्रासारख्या अनेक विषारी सापांच्या प्रजातींसह ते फ्रान्सच्या नॉन्टमध्ये राहतात. फिलिप यांचे सरपटणाऱ्या प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे. सरपटणारे प्राणी पाळणं हा फिलिप यांचा छंद असल्याने ते सर्व प्राण्यांची उत्तम काळजी घेतात. तसेच मगरीसोबत खेळायला त्यांना खूप आवडतं. (फोटो सौजन्य - REUTERS)टॅग्स :फ्रान्सFrance