तीन पाय आणि दोन गुप्तांग असलेला 'राजा', आई-वडिलांनी सांभाळ करण्यास दिला होता नकार! By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 12:23 PM 2020-03-10T12:23:18+5:30 2020-03-10T12:40:56+5:30
फ्रॅंकला या अतिरिक्त अवयवांसोबत जगावं लागलं होतं. कारण डॉक्टरांनी सांगितले होते की, अतिरिक्त पाय कापले तर त्याला पॅरालिसीस होऊ शकतो. कारण पायाचं हाड पाठीच्या कण्याजवळ होतं. फ्रान्सेसको फ्रॅंक लेंटिनी याचा जन्म १८ मे १८८९ मध्ये इटलीच्या सिसीली बेटावर झाला होता. निसर्गाने त्याला एका असामान्य रूपात जन्माला घातलं होतं. पण त्याने कधीच हिंमत हारली नाही आणि आपल्या मेहनतीने आपलं नाव मोठं केलं. त्याने अनेक सर्कसमध्ये काम केलं. चला जाणून घेऊ त्याचा प्रवास... (Image Credit :विकिमीडिया कॉमंस)
लेंटिनीला तीन पाय आणि दोन गुप्तांग होते. लेंटिनी एका दुर्मीळ विकाराने ग्रस्त होता. त्याच्या शरीरासोबत अर्ध जुळं बाळ जुळलेलं होतं. दुसरं बाळ हे त्याच्या पाठीच्या कण्यासोबत जोडलं गेलं होतं, त्याला एक पेल्विक हाड, गुप्तांग आणि पाय होते.
फ्रॅंकला या अतिरिक्त अवयवांसोबत जगावं लागलं होतं. कारण डॉक्टरांनी सांगितले होते की, अतिरिक्त पाय कापले तर त्याला पॅरालिसीस होऊ शकतो. कारण पायाचं हाड पाठीच्या कण्याजवळ होतं.
फ्रॅंकच्या आई-वडिलांनी त्याला स्वीकार करण्यास नकार दिला होता. अशात त्याचा सांभाळ त्याच्या काकूने केला. त्याला दिव्यांग मुलांच्या शाळेत घालण्यात आलं.
इथे त्याने धावणं, खेळणं, उड्या मारणं इतकंच काय तर आइस स्केटिंग करणंही शिकून घेतलं. दुसरी मुलं काहीच करू शकत नव्हते. त्यामुळे फ्रॅंकमध्ये नवा उत्साह निर्माण झाला.
फ्रॅंक १२ वर्षांचा होता तेव्हा त्याची भेट विंसेजनो मॅगनॅनोसोबत झाली. ते एका सर्कसचे मालक होते. त्याला वाटले की, फ्रॅंक सर्कसमध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला नाही.
फ्रॅंक लवकरच लोकांचा आवडता झाला. आपली स्फुर्ती, हजरजबाबीपणा आणि सेन्स ऑफ ह्यूमरने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
आपल्या तिसऱ्या पायाचा वापर फ्रॅंक स्टूलसारखा करत होता. त्याला नेहमी त्याच्या शूजबाबत विचारलं जात होतं.
लोक विचारायचे की, तो खास तीन सेट असलेले शूज खरेदी करतात? यावर फ्रॅंक सांगायचा की, तो नेहमी दोन जोड शूज खरेदी करत होता आणि एक शूज त्याच्या एक पायाच्या मित्राला देत होता.
आपल्या हजरजबाबीपणामुळे आणि सेन्स ऑफ ह्यूमरमुळे एक तरूणी त्याच्या प्रेमात पडली होती. दोघांनी लगेच लग्न केलं आणि दोघांना चार अपत्येही झाली.
फ्रॅंक लेंटिनीने ४० वर्ष काम केलं. ७८ वयात १९६६ मध्ये त्याचं निधन झालं. त्याने जवळपास सर्वच मोठया सर्कशींमध्ये काम केलं. सहकाऱ्यांमध्ये त्याला फार सन्मान मिळायचा. मित्र त्याला 'द किंग' किंवा राजा म्हणायचे.