मॉडलचे कपडे पाहून कॅबिन क्रू ने दिलं जॅकेट, नंतर एअरलाइन्सने मागितली माफी.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 10:15 AM 2021-02-04T10:15:04+5:30 2021-02-04T10:27:04+5:30
मॉडलनुसार, ती गोल्ड कोस्टहून मेलबर्नला जात असताना तिच्यासोबत ही घटना घडली. इजाबेल तिच्या पतीसोबत या फ्लाइटने प्रवास करत होती. इन्स्टाग्राम मॉडल इजाबेल एलेनॉरला तिच्या लहान कपड्यांमुळे तिला फ्लाइटमध्ये चढण्यास अडवण्यात आले होते. फ्लाइट अटेंडेंटने तिला रोखलं होतं. द सनच्या वृत्तानुसार जेटस्टार एअरवेजची एक क्रू मेंबर म्हणाली की, तिचे कपडे प्लेनमध्ये बसण्याच्या लायकीचे नाहीत'.
त्यानंतर इजाबेलला जॅकेट घालण्यास फोर्स करण्यात आला. मॉडलकडे त्यावेळी जॅकेट नव्हतं तर क्रू मेंबरने एका जॅकेटची व्यवस्था केली. या घटनेमुळे इजाबेलला चांगलीच शॉक्ड आहे. इजाबेलने ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्स घातली होती.
मॉडलनुसार, ती गोल्ड कोस्टहून मेलबर्नला जात असताना तिच्यासोबत ही घटना घडली. इजाबेल तिच्या पतीसोबत या फ्लाइटने प्रवास करत होती.
इजाबेलने सांगितले की, 'प्लेनमधील एका फ्लाइट अटेंडेंटने माझ्याकडे पाहिलं आणि मला विचार की, तुमच्याकडे जंपर किंवा जॅकेट आहे का? मला वाटलं मला सर्दी होऊ नये म्हणून तिने मला असं विचारलं असेल. कारण मेलबर्नमध्ये थंडी असू शकते''.
इजाबेलने पुढे सांगितले की, ती महिला मला म्हणाली की, तुम्ही जे कपडे घातले आहेत ते घालून तुम्ही प्रवास करू शकत नाही. तुम्ही बिकीनी घालून प्रवास करू शकत नाही. फ्लाइट अंटेडंटने आपल्या क्रूलला बोलवलं आणि त्यांना जॅकेटसाठी विचारणा करू लागली.
तिने इजाबेलला एक जॅकेट दिलं. याचा इजाबेल चांगलाच धक्का बसला आणि तिला अपमानित झाल्यासारखं वाटलं. कारण सगळे लोक तिच्याकडेच बघत होते.
या घटनेवर जेटस्टारचं म्हणणं आहे की, फ्लाइट अटेंडेंटलला एअरलाइन्स पॉलिसीबाबत काही गैरसमज होते. एअरलाइन कंपनी मॉडलची माफी मांगते.