लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी

By manali.bagul | Published: November 29, 2020 12:16 PM2020-11-29T12:16:53+5:302020-11-29T12:48:48+5:30

सध्या सोशल मीडियावर एका तरूणाचा आणि त्याच्या आईचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा तरूण आपल्या आईला घेऊन वेगवेगळ्या देशात फिरत आहे. सोशल मीडियावर या फोटोजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या तरूणाचे नाव सरथ असून अधिकाधिक ठिकाणांचा प्रवास आपल्या आईसोबत सरथने केला आहे. सरथ कृष्णन आपल्या आईचा हात पकडून वाराणसीच्या घाटांमध्ये फिरत आहे. या व्हिडीओमध्ये भजनाचा आवाज येत आहे. असं सुंदर स्वप्न पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरथ यांनी सांगितले की, ''वाराणसीतील घाटांतून येत असलेल्या सुगंधाची अनुभूती मी घेतली. त्यानंतर मी अंथरूणातून उठून लॅपटॉपवरून दोन विमानाची तिकिटं बूक केली. स्वयंपाक घरात जाऊन त्यांनी आपल्या आईला सांगितले की, आई मी तिकटं बूक केलंय आता आपण निघायची तयारी करू.''

त्यांच्या आईने जेव्हा वाराणसीला जाण्याचे ऐकले तेव्हा त्या आश्चर्यचिकत झाल्या. सुरूवातीला त्यांनी यासाठी नकार दिला पण मुलाने काही ऐकले नाही. काही तासांनी त्यांनी आपल्या बॅग भरायला घेतली आणि आंतरराष्ट्रीय विमान तळावर पोहोचले. जवळपास संध्याकाळी ७ वाजता हे मायलेक वाराणसीला पोहोचले. सरथ यांच्या आईसाठी हे विशेष नव्हते कारण त्यांचा मुलगा नेहमीच आईसह विविध ठिकाणं फिरण्याची तयारी करतो आणि लगेचच बॅगसुद्धा भरायला घेतो.

३० वर्षांच्या सरथने सांगितले की, ''आईसोबत कोणताही प्रवास करणं हे स्वर्ग सुखाप्रमाणे वाटतं. दर तीन महिन्यांनी आम्ही प्रवासाला जातो. आधीही आम्ही मुंबई, नाशिक, शिर्डी, अजिंठा वेरूळला भेट दिली आहे.'' ६० वर्षीय गीता यांनी सांगितले की, ''मी माझ्या मुलासोबत दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, तिब्बत, नेपाल और माउंट एवरेस्ट वर आतापर्यंत जाऊन आली आहे.''

सारथने आपल्या कामाचा भाग म्हणून आणि दर्शनासाठी बर्‍याच सहली घेतल्या आहेत. त्यांनी सांगितले की, "एक सुंदर देखावा आणि नवीन अनुभवांचा आनंद मला आईबरोबर घ्यायचा होता. मी तिला विचारले की ती माझ्याबरोबर येणार का?" आई आध्यात्मिक व्यक्ती म्हणून आमच्या घराबाहेर पडली नाही, मी तिला माझ्याबरोबर येण्यास भाग पाडले. आम्ही प्रवास सुरू केला की ती खूप आनंदी असते.

गीता म्हणाल्या की, "या वर्षांत मी काय करेन ते मला माहित नव्हते. मी ६० वर्षांची आहे, मधुमेहामुळे, या वयात जग पाहण्याची आशा नव्हती. पण आता मी खूप आनंदी आहे आणि मुलासह पुढच्या सहलीची योजना करत आहे. माझी प्रार्थना आहे की आता माझ्या आयुष्याने माझे नशीब आणखी काही वर्षे वाढवावे जेणेकरुन मी उर्वरित ठिकाणी देखील जाऊ शकेन.''(Image Credit-फेसबुक/Sarath Krishnan)