भारतातील अनेकदा पाहिलं असेल, आता हे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर संसद भवन बघा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:22 PM 2020-12-10T15:22:12+5:30 2020-12-10T15:35:31+5:30
जगात आधीच असे काही संसद भवन आहेत जे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातल्या काही खास संसद भवनाचे फोटो दाखवणार आहोत. हे संसद भवन एखाद्या आलिशान महलासारखे भासतात. डेमोक्रेटिक देशांमध्ये लोक त्यांच्या प्रतिनिधींना निवडतात. निवडून गेलेले नेते आपल्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. या लोकांच्या मीटिंगसाठी, चर्चेसाठी आणि वाद-विवाद करण्यासाठी पार्लमेंट तयार केली जाते. पार्लमेंट म्हणजे संसद भवन. या ठिकाणी जनतेचे प्रतिनीधी एकत्र येतात आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतात. भारताचं संसद भवन किती सुंदर दिसतं हे तुम्हाला माहीत आहेच. आता तर देशात नवीन संसद भवन तयार होणार आहे. नव्या संसद भवनात सर्वच आधुनिक सुविधा असतील. पण जगात आधीच असे काही संसद भवन आहेत जे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातल्या काही खास संसद भवनाचे फोटो दाखवणार आहोत. हे संसद भवन एखाद्या आलिशान महलासारखे भासतात.
ब्रिटनचा पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर संसद भवन आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. गोल्डन रंगाची इमारत रॉयल लूकसाठी प्रसिद्ध आहे. खासकरून याच्या समोरून वाहणारी थेम्स नदी. हे संसद भवन थेम्स नदीच्या किनाऱ्यावर आहे.
ब्रिटनचं हे संसद भवनात तीन टॉवर आहेत. एलिझाबेथ टॉवर, न्यू पॅलेस आणि हाउस ऑफ कॉमन्स. महत्वाची बाब म्हणजे इथे यूकेतील लोकांसाठी केवळ कायदेच बनतात असं नाही तर दरवर्षी इथे लाखो टुरिस्टही फिरायला येतात.
भारताचा शेजारी देश श्रीलंकेतील संसद भवनही आपल्या भव्यतेसाठी ओळखलं जातं. याचा नंबर जगातल्या सर्वात सुंदर संसद भवनात लागतो. याची भव्यता रात्री बघण्यासारखी असते.
श्रीलंकेतील संसद भवनाची नेहमीच चर्चा होते. हे तयार करण्यासाठी चार वर्षे लागली होती. याचं डिझाइन असं केलं गेलं की, प्रकाशात या संसद भवनाचे दरवाजे चांदीसारखे चमकतात. सोबत तलावाच्या किनाऱ्यावर असल्याने याचा लूकही खास होतो.
जर्मनीचं संसद भवन हे आपल्या भव्य डिझाइनसाठी ओळखलं जातं. याचं निर्माण १८९४ मध्ये सुरू झालं होतं जे १९८४ मध्ये तयार झालं होतं. हे संसद भवन बघण्यासाठी दरवर्षी लाखों लोक बर्लिनला जातात.
रोमानियातील संसद भवनही फार आकर्षक आहे. हे संसद भवन केवळ सुंदरतेसाठी नाही तर वेगळ्या कारणासाठीही प्रसिद्ध आहे. हे तयार करण्यासाठी २० हजार सैनिक आणि कैद्यांनी दिवसरात्र काम केलं होतं.
हे सुंदर इमारत संगमरवराने तयार केली आहे. सोबतच कधी यावर हल्ला झाला तर पळून जाण्यासाठी ८ इमरजन्सी दरवाजेही आहेत.
या लिस्टमध्ये पुढील नाव आहे फिनलॅंडच्या संसद भवनाचं. या देशाचं संसद भवन ग्रेनाइटने तयार करण्यात आलं आहे.
हे तयार करणाऱ्या कारागिरांनी हे सुंदर तर बनवलंच सोबतच मजबूतही केलं.