हौसेला मोल नाही; लिलावात लावलेल्या 'या' बोलींचे आकडे पाहून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 10:48 PM2019-04-13T22:48:09+5:302019-04-13T22:52:25+5:30

वन सेंट मजेंटा स्टॅम्प- या स्टॅम्पचा 17 जून 2014 रोजी लिलाव झाला. यासाठी 9.5 मिलियन डॉलरची (जवळपास 70,32,37,500 रुपये) सर्वाधिक बोली लागली. याआधी या स्टॅम्पचा तीनवेळा लिलाव झाला होता.

मॅक्डोनाल्ड व्हायोला- 1979 मध्ये तयार करण्यात आलेलं हे वाद्य 1820 मध्ये गॉडफ्रे बॉसव्हिलेनं खरेदी केलं. बॉसव्हिलेनं यासाठी 45 मिलियन डॉलरीची (जवळपास 3,33,65,25,000 रुपये) बोली लावली.

गोल्डन बलून डॉग- या अनोख्या गोल्डन बलून डॉगची निर्मिती जेफ कून्सनं केली. 13 नोव्हेंबर 2013 रोजी गोल्डन बलून डॉगचा लिलाव झाला. तेव्हा त्यासाठी लागलेली सर्वाधिक बोली होती 58.4 मिलियन डॉलर.

द क्लर्क सिकल लिफ कार्पेट- इराणमधल्या कर्मणमध्ये या कार्पेटची निर्मिती करण्यात आली. या कार्पेटचा न्यूयॉर्कमध्ये 2013 मध्ये लिलाव झाला. त्यावेळी त्यासाठी 33.7 मिलियन डॉलरची बोली लागली.

पिंक स्टार डायमंड- 59.6 कॅरेटच्या या डायमंडसाठी तब्बल 83 million डॉलरची लागली होती.

द बे साल्म बूक- या वादग्रस्त पुस्तकाची छपाई 1640 मध्ये झाली. या पुस्तकासाठी 14 मिलियन डॉलरची बोली लागली होती. उत्तर अमेरिकेत ब्रिटिशांचं राज्य असताना छापण्यात आलेलं हे पहिलं पुस्तक.

द ग्रेव्हज सुपरकॉम्प्लिकेशन- 1933 मध्ये पटेक फिलिप यांनी या पॉकेट वॉचची निर्मिती केली. यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. या घड्याळाची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. हे घड्याळ अतिशय अनोखं आहे. या घड्याळाला लिलावात 11 मिलियन डॉलर रुपये मिळाले.

प्लँक टॉप पेडेस्टल टेबल- रोडवूडपासून तयार करण्यात आलेल्या या 15 फुटांच्या टेबलचा लिलाव 2013 मध्ये झाला. यासाठी 9 मिलियन डॉलरची सर्वाधिक बोली लागली.