फक्त अर्धा लीटर पाणी ४४ लाख रुपयाला, काय आहे या पाण्यात? जाणून घ्या जगात कुठे मिळतं हे पाणी By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 06:25 PM 2021-10-07T18:25:45+5:30 2021-10-07T19:03:16+5:30
पाणी हे जीवन आहे. पाण्याचा आपल्या आरोग्यदायी राहण्यातही मोठा वाटा आहे. म्हणूनच डॉक्टरही नेहमी जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगतात. त्यामुळेच जगभरात पाणी कमीत कमी किमतीत उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, जगात पाण्याचे असेही काही ब्रँड्स आहेत ज्यांच्या पाण्याची किंमत ऐकून तुम्ही अवाक् व्हाल आणि ही पाण्याचीच किंमत आहे का असा प्रश्न वारंवार स्वतःलाच विचाराल जगातील सर्वात महागड्या बाटलीबंद पाण्याची किंमत ६० हजार डॉलर म्हणजेच ४४ लाख रुपये प्रति ७५० मिली इतकी आहे. या महागड्या पाण्याच्या ब्रँडचं नाव 'Acqua di Cristallo Tributo a Modigliani' असं आहे. हे पाणी फिजी आणि फ्रान्समधील एका नैसर्गिक झऱ्याचं आहे. विशेष म्हणजे हे पाणी २४ कॅरेट सोन्याच्या बॉटलमध्ये पॅक केलं जातं.
प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या बॉटलमधून पाणी पितात. २०१७ मध्ये या पाण्याच्या ब्रँडचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वाग महागडं पाणी म्हणून नोंदवलं गेलं होतं.
कोना नागरी पाणी हवाई (Hawai) येथील आहे आणि ते प्लास्टिक बॉटलमध्येच विकलं जातं. या पाण्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. या पाण्यामुळे केवळ शरीराचा उर्जा स्तर वाढत नाही, तर त्वचा देखील ताजीतवाणी होते. हे पाणी हवाई बेटावरुन येतं. या पाण्याचं सामान्य पाण्याच्या तुलनेत लवकर बाष्पीभवन होतं.
फिलिको (Fillico) ज्वेल वॉटर हे पाणी जपानमधील आहे. या पाण्याची बॉटल स्वारोवस्की क्रिस्टलने सजवलेली असते. या प्रकारची सजावट गिफ्ट म्हणून आयडियल मानली जाते. बाजारात या बॉटलची खूप कमी संख्या आहे. पाण्यापेक्षा या बॉटलचीच किंमत अधिक आहे. या बाटलीला गोल्डन क्राऊनने झाकलं जातं. या बाटलीतील पाणी ओसाकाजवळील रोक्को माऊंटेन येथून आणलं जातं. हे पाणी ग्रेनाईटचा उपयोग करुन शुद्ध केलं जातं. या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण अधिक असतं.
Bling H20 पाणी अमेरिकामधील आहे. हे पाणी तब्बल ९ पातळ्यांवर शुद्ध केलं जातं. हे पाणी वारंवार शुद्ध केलं जातं आणि मग पॅक केलं जातं. या पाण्याची बाटली ब्लिंग ब्लिंगने सजवलं जातं.
हे कॅनडातील झऱ्याचं पाणी आहे. याची किंमत १४ डॉलर म्हणजेच १ हजार २० रुपये प्रति ७५० मिलीलीटर आहे.
अॅक्वा डेको (Aqua Deco) ब्रँडचं पाणी देखील कॅनडामधून येतं. या पाण्याची बॉटल अत्तरच्या बॉटलचीच आठवण करुन देते.
आर्टेशियन स्प्रिंग वॉटर ज्याला लॉक्वेन आर्ट्स मिनरल वॉटर या नावाने ओळखलं जातं. हे पाणी माऊंटेन एक्वीफरमधून येतं. हे ठिकाण सॅन कार्लोस बारिलपोचेजवळ आहे. हा भाग अर्जेंटीनाचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे. या पाण्यात मिनरल्सचं प्रमाण अधिक आहे.
फिन हे एक जपानी वॉलकनिक पाणी आहे. हे पाणी प्राचीन वॉलकेनिक रोकचा (volcanic rock) उपयोग करुन शुद्ध केलं जातं. हा वॉलकेनिक रॉक सर्वात सुंदर ठिकाण असलेल्या माऊंट फ़ुजी येथून येतो.
तस्मानियन रेन हा पाण्याचा ऑस्ट्रेलियातील ब्रँड आहे. हे पाणी तस्मानिया बेटावरुन येतं. हे पाणी खूप शुद्ध आहे, असं मानलं जातं. हे पाणी पाऊस पडला की जमा केलं जातं. त्याला जमिनीचा स्पर्श होऊ दिला जात नाही. हे पाणी खूपच सुंदर बॉटलमध्ये पॅक केलं जातं.