हजारो कोटींचे मालक आहेत हे 5 पाळीव प्राणी, संपत्ती वाचून व्हाल अवाक्... By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 02:46 PM 2023-01-07T14:46:36+5:30 2023-01-07T14:57:25+5:30
Most Richest Pets : जगात असेही काही प्राणी आहेत ज्यांना मुनष्यांपेक्षा जास्त लोकप्रियता आणि पैसा मिळतो. हे प्राणी हजारो कोटी रूपयांचे मालक आहेत आणि हाय लाइफ जगतात. Meet The World's Five Wealthiest Pets: लोकप्रियता आणि संपत्ती केवळ मनुष्यांनाच मिळते असा विचार तुम्ही करत असाल तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण नाव, पैसा आणि लोकप्रियता प्राण्यांनाही मिळते. जगात असेही काही प्राणी आहेत ज्यांना मुनष्यांपेक्षा जास्त लोकप्रियता आणि पैसा मिळतो. हे प्राणी हजारो कोटी रूपयांचे मालक आहेत आणि हाय लाइफ जगतात. जर तुम्हाला याबाबत माहीत नसेल तर आम्ही सांगणार आहोत. जगातल्या सगळ्यात श्रीमंत प्राण्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे सोशल मीडिया स्टार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर्मन शेफर्ड प्रजातीचा Gunther IV जगातला सगळ्यात श्रीमंत पाळीव प्राणी आहे. त्याची मालकी इटलीची मीडिया कंपनी Gunther Corporation कडे आहे. त्यांच्याकडे 4 हजार कोटी रूपयांची संपत्ती आहे.
Nala नावाची ही मांजर आजकाल सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सामान्य दिसणारी ही मांजर सामान्य नाहीये. नाला नावाच्या या मांजरीकडे 800 कोटी रूपयांची एकूण संपत्ती आहे. या मांजरी तिचा कॅट फूड ब्रांड आहे. इन्स्टावर तिचे 44 लाख फॉलोअर्स आहेत. ही जगातील दुसरी सगळ्यात श्रीमंत मांजर आहे. तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे.
पॉप स्टार टेलर स्विफ्ट (Taylor Swift) च्या या पाळीव मांजरीचं नाव ऑलीविया बेंसन (Olivia Benson) आहे. ही मांजर 800 कोटी रूपयांची मालक आहे. टेलर स्विफ्टने अनेक व्हिडिओमध्ये तिला दाखवलं आहे. या मांजरीकडे तिचे स्वत:चे अनेक ब्रांड आहेत.
पॉमेरियन प्रजातीचा JiffPom सगळ्यात कमाई करणाऱ्या कॅनाइन इनफ्लूएंसर्सपैकी एक आहे. हा डॉगी 200 कोटी रूपयांचा मालक आहे. इन्स्टावर त्याचे 55 लाख फॉलोअर्स आहेत. त्याची प्रत्येक पोस्टसाठी त्याला साधारण 33000 डॉलर मिळतात.
अमेरिकन टीव्ही स्टार ओपरा विन्फ्रे (Oprah Winfrey) कडे पाच पाळीव डॉगी आहेत. ते सुद्धा खूप श्रीमंत आहेत. तिच्या या पाच डॉगींची नावे Sadie, Sunny, Lauren, Layla आणि Luke आहेत. ते एकूण 250 कोटी रूपयांचे मालक आहेत. यातील प्रत्येक डॉगीचा स्वत:चा ट्रस्ट फंड आहे.