'या' ठिकाणी जाण्याची परवानगी माणसांना नाही By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 03:38 PM 2018-07-16T15:38:51+5:30 2018-07-16T15:41:55+5:30
व्हॅटिकन सिक्रेट आर्काईव्ह: या प्राचीन ग्रंथालयात अनेक रहस्य दडलेली आहेत. जगभरातील अनेक रहस्यांची उत्तरं इथल्या पुस्तकांमध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी जाण्याची परवानगी कोणालाही नाही.
स्नेक आयलँड : ब्राझीलजवळच्या या बेटावर अतिशय विषारी साप आढळून येतात. गोल्डन लांसहेड वाइपर या जातीच्या सापांचं प्रमाण इथं सर्वाधिक आहे. या बेटावर गेलेल्या अनेक व्यक्ती कधीही परत आलेल्या नाहीत. ब्राझीलच्या नौदलाकडे या बेटाची जबाबदारी आहे.
एरिया 51: अमेरिकेतील लास वेगासपासून 80 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या परिसरात अमेरिकची अनेक गुपितं दडलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणाच्या देखरेखीचं काम अमेरिकन सरकारकडून केलं जातं. या ठिकाणी युएफओ उडतानाही दिसले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना इथं जाण्याची परवानगी नाही.
डेथ व्हॅली : पूर्व कॅलिफॉर्नियातील एक परिसर डेथ व्हॅली म्हणून ओळखला जातो. या भागातील तापमान 130 डिग्री इतकं आहे. या ठिकाणी पाणी नाही. त्यामुळेच सामान्य माणसांना इथं प्रवेश दिला जात नाही.
मेझगोर्ये : याठिकाणी रशियाचं अण्वस्त्र केंद्र आहे. क्षेपणास्त्र संशोधनाचं काम या भागात होतं. मात्र ते अतिशय गुप्त स्वरुपाचं आहे. अण्वस्त्र हल्ल्यातही सुरक्षित राहिल, अशा बंकरची निर्मिती या भागात रशियन सरकारकडून सुरू असल्याची चर्चा जगभरात आहे. रशियाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठिकाण असल्यानं या भागात चोख सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे इथे जाण्याची परवानगी सामान्य माणसाला नाही.