अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत फरार झाली ४० वर्षीय चार लेकरांची आई, पती करतोय न्यायाची मागणी.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:28 AM 2021-03-09T11:28:35+5:30 2021-03-09T11:58:25+5:30
Mother of four run away with his boyfriend : आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचं वय ४० वर्षे तर तिच्या प्रियकराचं वय २० वर्षे आहे. आता या महिलेा पती चारही मुलांना घेऊन न्यायाची मागणी करत आहे. उत्तराखंडच्या रूडकीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एक चार मुलांची आई असलेली महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचं वय ४० वर्षे तर तिच्या प्रियकराचं वय २० वर्षे आहे. आता या महिलेा पती चारही मुलांना घेऊन न्यायाची मागणी करत आहे.
चार मुलांची आई असलेल्या महिलेचं त्यांच्याच भागात राहणाऱ्या एका अविवाहित आणि तिच्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं.
काही दिवस त्यांचं हे प्रकरण गपचूप सुरू होतं. पण हे प्रकरण फार काळ लपून राहू शकलं नाही.
जसं त्यांचं प्रकरण उघड झालं दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पती मुलांना घेऊन तक्रारीसाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.
असे सांगितले जात आहे की, तो अनेक दिवसांपासून मुलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचत होता. तो पोलिसांना पत्नीला शोधण्याची विनंती करत होता.
पोलिसांनी तपास सुरू केला आणि पळून गेल्यानंतर २० दिवसांनी समजले की, ते दोघे उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये आहेत. त्यानंतर महिलेला परत आणलं गेलं.
असं असलं तरी महिलेचा कथित प्रेमी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ८ मार्च महिला दिवसाला तिला घेऊन कोतवाली सिविल लाइन्सला पोहोचली.
त्यासोबतच महिलेच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. महिलेला समजावण्यात आले. पण ती कुणाचं काही ऐकायला तयार नाही.
या महिलेने स्पष्टपणे सांगितले की ती तिच्या पतीकडे जाणार नाही. तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं आहे. पोलिसांसोबतच इतरही लोकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.
पण तिच्या डोक्यात प्रेमाचं असं भूत शिरलं आहे की, तिला मुलांचीही चिंता नाही. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणावर परिवारातील लोकांनीच निर्णय घ्यावा. सध्या या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे. तर लोकांना तिच्या चार मुलांची चिंता आहे.