आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:51 PM2020-05-01T13:51:26+5:302020-05-01T14:41:31+5:30

कोरोना व्हायसरमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी वैयक्तीक स्वच्छता आणि सोशल डिस्टेंसिंग फार महत्वाचं आहे. देशभरात अनेक ठिकाणी लोक सोशल डिस्टेंसिंगचं पालन करताना दिसून येत आहेत.

त्रिपूरा राज्यातील आगरताळामधील एका व्यक्तीने स्वतः बाईक तयार करून सोशल डिस्टेंसिंगचं महत्व पटवून दिलं आहे. ही बाईक वीजेवर चालणारी असून यात चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीमध्ये एक मीटरचं अंतर असेल.

ही बाईक तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव पार्थ शाहा आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.

समाजातील अनेकजण कोणतंही प्रशिक्षण न घेता, कोणतीही डिग्री किंवा डिप्लोमा न करता असे पराक्रम करतात. त्रिपूरामधील हा व्यक्ती याचेच उदाहरण आहे. या व्यक्तीचं वय ३९ वर्ष आहे.

पार्थ यांनी कोरोनाच्या महामारीतून वाचण्यासाठी आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्यासाठी एक अनोखी बाईक तयार केली आहे.

ही सोशल डिस्टेंसिंग मेंन्टेन करणारी बाईक तयार करण्याासाठी पार्थने आधी जुनी बाईक विकत घेतली तर या बाईकची लांबी वाढवली. जेणेकरून दोन व्यक्ती बसल्यानंतरमध्ये १ मीटरचं अंतर ठेवता येईल.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही बाईक तयार करण्यामागे पार्थचा कोणताही व्यावसाईक हेतू नव्हता.