मुकेश अंबानींनी आपल्या 'खास' माणसाला गिफ्ट केली २२ मजली इमारत; किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:03 PM2023-04-25T18:03:22+5:302023-04-28T13:59:16+5:30

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे त्यांच्या मोठ्या मनासाठीही ओळखले जातात. मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी चॅरिटीच्या माध्यमातून समाजसेवा करताना दिसतात. रिलायन्स उद्योग समुहाचे मालक असलेले अंबानी त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही खूप जपतात.

मुकेश अंबानी यांचे अनेक किस्से आहेत. त्यातील एक म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रिज काम करणारे आणि अंबानी यांचे निकटवर्तीय असलेले मनोद मोदी यांना अंबानींनी आलिशान घर गिफ्ट म्हणून दिले होते. हे घर इतकं भव्य होते ज्याची किंमत ऐकून कुणीही थक्क होईल.

मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना गिफ्ट म्हणून दिलेल्या घराची किंमत तब्बल १५०० कोटी रुपये आहे. मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीतील सर्वात विश्वासू अधिकारी आणि मुकेश अंबानी यांचे राईट हँड म्हणून ओळखले जातात.

प्रॉपर्टी वेबसाईट मॅजिक ब्रिक्सनुसार, मनोज मोदी यांना जे घर गिफ्ट केले ते २२ मजली इमारत आहे. इतकेच नाही तर ते मुंबईच्या प्राइम लोकेशन नेपियन सी रोडला आहे. १ वर्षापूर्वी अंबानी यांनी मोदी यांना भेट दिली होती.

जिओ आणि रिटेल रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे दीर्घकाळ मोठ्या पदावर असलेले मनोज मोदी यांना RIL चे मालक मुकेश अंबानी यांनी २२ मजली इमारत भेट दिली. 'वृंदावन' नावाची ही मालमत्ता मुंबईतील पॉश क्षेत्र असलेल्या नेपियन सी रोडवर आहे.

उल्लेखनीय म्हणजे, JSW समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल हे देखील नेपियन सी रोडवरील माहेश्वरी हाऊसमध्ये राहतात. नेपियन सी रोडवरील निवासी मालमत्तेची किंमत साधारणपणे ४५१०० ते ७०६०० रुपये प्रति चौरस फूट आहे.

मोदींनी गिफ्ट केलेल्या नवीन उंच इमारतीची किंमत १५०० कोटी रुपये आहे. प्रत्येक मजला ८००० चौरस फूट पसरलेला असून इमारतीचे एकूण क्षेत्रफळ १.७ लाख चौरस फूट आहे. या इमारतीत ७ मजले केवळ पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

इमारतीत लावलेले फर्निचर हे इटलीहून मागवण्यात आले. मनोज मोदी यांनी मुंबईतील २ घरे विकले. ज्याची कागदोपत्री किंमत एकूण ४१.५ कोटी आहे. हे दोन्ही अपार्टंमधील घरे महालक्ष्मी येथे होते. त्यातील एक २८ व्या मजल्यावर वर दुसरे २९ व्या मजल्यावर होते.

मुकेश अंबानी यांनी मोदींना गिफ्ट दिलेल्या इमारतीत अनेक वस्तू मुकेश आणि नीता अंबानी यांनी स्वत: खरेदी केल्या आहेत. वृंदावनच्या छतावर इन्फनाईट स्वीमिंग पूल आहे. पुलाच्या एका टोकाला अरबी समुद्राचं दृश्य दिसतं.

इमारतीच्या ८ ते १० व्या मजल्यावर मनोरंजनाच्या सुविधा आहेत. अत्याधुनिक खेळांच्या सोयी या ठिकाणी आहेत. पार्टी रुम, फॉर्मल मीटिंग एरिया, स्पा, ५० प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेलं थिएटर याच भागात आहे.