काय सांगता! दोन नाही तर चार पाय होते या महिलेला, तिच्या जन्माचं रहस्य आहे फारच रोमांचक By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 11:57 AM 2021-12-03T11:57:28+5:30 2021-12-03T12:11:27+5:30
Myrtle Corbin four legged woman : मिर्टल कॉर्बिन जगभरात चार पायांची महिला म्हणून प्रसिद्ध होती. अखेर ६ मे १९२८ मध्ये अमेरिकेतील टेक्सासमध्ये वयाच्या ६०व्या वर्षी मिर्टव कॉर्बिनचं निधन झालं. आई-वडील होणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी एका वरदानासारखं असतं आणि मुलं ही मनुष्यासाठी निसर्गाचं सर्वात सुंदर गिफ्ट असतात. मुल होण्याचा आनंद कुणीही शब्दात सांगू शकत नाहीत. बाळाचा जन्म झाला तर मिठाई वाटली जाते. कार्यक्रम ठेवले जातात. पण प्रत्येक बाळाच्या हे नशीबात नसतं. काही लोक असेही असतात जे आपल्या लेकरांना स्वीकारण्यास नकार देतात. कारण या लेकरांमध्ये काहीना काही समस्या असतात. अशात त्यांना घरच्यांसोबत बाहेरच्या लोकांचेही टोमणे ऐकावे लागतात.
आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबाबत सांगणार आहोत, जिला दोनऐवजी चार पाय होते. ती तिच्या असामान्य पायांसोबत साधारण ६० वर्षे जगली. मेडिकल सायन्समध्ये अशा केसेस फार कमी बघायला मिळतात. पण ही एक सत्य घटना आहे.
या महिलेचं नाव होतं मिर्टल कॉर्बिन (Myrtle Corbin). मिर्टलचा जन्म १२ मे १८६८ मध्ये अमेरिकेतील टेनेसीमध्ये झाला होता. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिला बघून सगळेच हैराण झाले होते. कारण तिच्या शरीरात दोन नाही तर चार पाय होते. यातील दोन पाय सामान्य होते. पण एक्स्ट्रा दोन पाय सामान्य पायांच्या मधोमध होते. हे पाय दुसऱ्या पायांच्या तुलनेत लहान आणि नाजूक होते. जन्म झाल्यावर काही वर्ष मिर्टल या पायांवर उभीही राहू शकत नव्हती.
डॉक्टरांनुसार, मिर्टलचे दोन मधले पाय तिचे स्वत:चे नाहीत. ते तिच्या डायपिजस जुळ्या बहिणीचे होते. जे या जगात येऊ शकली नाही. आईच्या पोटात तिचे पाय विकसित झाले. पण शरीर विकसित होऊ शकलं नाही. हेच कारण आहे की मिर्टलचा जन्म चार पायांसोबत झाला आणि तिला आयुष्यभर त्या पायांसोबत जगावं लागलं.
मिर्टल कॉर्बिनच्या सामान्य पायांचे बोटे तर ठीक होती, पण तिचे जे दोन एक्स्ट्रा पाय होते, त्यांना केवळ ३-३ बोटे होती. मिर्टल या वेगळेपणामुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली होती.
मिर्टल कॉर्बिनची एक बहीण होती जिचं नाव विल्ले एन होतं. विल्लेचं लगन लॉक बिकनेल नावाच्या तरूणासोबत झालं होतं. लॉक बिकनेलच्या भावाचं नाव जेम्स क्लिंटन बिकनेल होतं. तो डॉक्टर होता. जेम्स क्लिंटन बिकनेलने मिर्टला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला होता. त्याने मिर्टलला लग्नासाठी विचारलं. त्यानंतर १९ वयाची असताना मिर्टलने जेम्स क्लिंटन बिकनेलसोबत लग्न केलं.
मिर्टल आणि जेम्सचं लग्न खरं प्रेम काय असतं हे दाखवते. पण त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्वात रहस्यमय बाब ही होती की जेम्स ना केवळ मिर्टल तर तिच्या न जन्मलेल्या बहिणीसोबत संबंध ठेवू शकत होता. म्हणजे मिर्टलच्या शरीरात एक नाही तर दोन व्हजायना होत्या. या समस्येनंतरही मिर्टलने ८ मुलांना जन्म दिला होता. ज्यातील ३ बाळांचं जन्मताच निधन झालं होतं.
मिर्टल कॉर्बिन जगभरात चार पायांची महिला म्हणून प्रसिद्ध होती. अखेर ६ मे १९२८ मध्ये अमेरिकेतील टेक्सासमध्ये वयाच्या ६०व्या वर्षी मिर्टव कॉर्बिनचं निधन झालं.