अंतराळातील 'अशा' ग्रहावर NASA पोहचणार; ज्याच्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक माणूस श्रीमंत होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:28 PM 2020-08-17T16:28:29+5:30 2020-08-17T16:36:29+5:30
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा(NASA) एका लघुग्रहांचा अभ्यास करणार आहे जो पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला अब्जाधीश बनवू शकेल. हा लघुग्रह पूर्णपणे लोह, निकल आणि सिलिकाने बनलेला आहे.
त्यामध्ये अस्तित्त्वात असलेल्या या धातूंची विक्री केली गेली तर पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुमारे १० हजार कोटी रुपये मिळतील.
नासाने या ग्रहाचं नाव १६ साइकी दिले आहे. या संपूर्ण ग्रहावर लोहाची एकूण किंमत सुमारे 10,000 क्वाड्रिलियन पौंड आहे. म्हणजे 10000 च्या मागे 15 शून्य आहे.
या ग्रहाचा अभ्यास करणाऱ्या अंतराळ यानालाही साइकी नावही देण्यात आले आहे.
नासाचे साइकी अंतराळ यान २२६ किमी-रुंद लघुग्रहांचा अभ्यास करेल. अंतराळ यानाची क्रिटिकल डिझाइन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
इंडिया टाइम्सनुसार 10,000 क्वॉड्रिलियन पाउंड म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सुमारे १० हजार कोटी रुपये मिळतील. ही किंमत त्या लघुग्रहवर उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण लोखंडाची आहे.
साइकी 16 मंगळ व गुरु या ग्रहादरम्यान फिरत आहे. बातमी अशीही मिळाली की, नासाने या लघुग्रहातील लोखंडाची चाचणी घेण्यासाठी त्याच्या अवकाशयानातून मिशन सुरू करण्यासाठी स्पेस एक्सचा मालक एलोन मस्ककडे मदत मागितली आहे.
लघुग्रह 16 साइकी पाच वर्षात आपल्या सूर्याच्या भोवती एक फेरी मारतो. त्याचा एक दिवस 4.196 तासाचा असतो त्याचे वजन पृथ्वीवरील चंद्राच्या वजनाच्या केवळ १ टक्के आहे.
हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आणण्याची कोणतीही योजना नाही, असं नासाचं म्हणणं आहे. पण याठिकाणी जाऊन तेथील लोखंडाची चाचणी घेण्याची योजना आखली जात आहे.
ऑगस्ट २०२२ मध्ये नासा एस्टरॉईड 16 साइकीवर अंतराळयान पाठवण्याची तयारी करत आहे. जर स्पेस एक्सने आपल्या अंतराळ यानातून या लघुग्रहात रोबोटिक मिशन पाठविला तर तिथे अभ्यास करुन पुन्हा परत येण्यासाठी सात वर्षे लागतील.