वयाच्या १४व्या वर्षी त्याला समजलं तो पुरुष नाही महिला आहे, मग सुरु झाला ट्रान्स क्वीनचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 11:43 AM 2022-03-13T11:43:45+5:30 2022-03-13T12:03:00+5:30
वयाच्या १४-१५व्या वर्षी त्याला त्याच्यातील काही बदल जाणवू लागले. आईला सांगताच आईने ते स्वीकारलं पण वडिलांच्या नाराजीमुळे त्यानं १८ व्या वर्षी घर सोडलं अन् पुढे जे झालं त्यानं त्याचं जीवनच बदललं. जाणून घ्या या ट्रान्स क्वीनचा प्रवास... बिहारमधील (Bihar News) कटिहारमधील एका शीख कुटुंबात जन्मलेल्या मॉडेलचा प्रवास फार खडतर होता.
मॉडेल, अभिनेत्री आणि मिस ट्रान्सक्वीन इंडिया ब्युटी पेजेंट जिंकणाऱ्या नव्या सिंग या तरुणीने वयाच्या 14-15 व्या वर्षी आईला तिच्या शरीरात होणाऱ्या बदलाबाबत सांगितलं होतं. त्यावर तुला हवं असलेलं आयुष्य संघर्षाचं असल्याचं आईने सांगितलं होतं. मात्र तीदेखील मागे फिरली नाही.
अभिनेत्री सांगते, लहानपणी मुलाच्या जेंडर वरुन कोणीच बोलत नव्हतं. हळू हळू ती मोठी होऊ लागली. त्याचं वागणं मुलींसारखं होतं. त्यामुळे लोक तिची खिल्ली फडवत.
मला 12 व्या वर्षी वाटलं की, मी मुलगी आहे. आई-वडिलांसोबत कुठंही गेले की, लोक माझी खिल्ली उडवत. यामुळे माझ्या पालकांना खूप त्रास सहन करावा लागला.
मला आईचा पाठिंबा होता, मात्र वडिलांनी आधार दिला नाही. वडिलांमुळे वयाच्या१८ व्या वर्षी तो मुंबईला आला.
मुंबईतील मावशीकडे राहत होता. येथपासून त्याची रिअल ट्रान्स वुमनचा प्रवास सुरू झाला. जी बाब १८ वर्षांपर्यंत माझ्या आई-वडिलांना कळाली नाही, ते माझ्या मावशीने १८ तासात ओळखलं.
यानंतर मावशी त्याला घेऊन NGO आणि डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मावशीला सांगितलं की, हा चुकीच्या शरीरात आहे. त्याला स्त्री म्हणून जगू द्या. यामुळे त्याचं जगणं सोपं होईल.
डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हार्मोन्स थेरेपी सुरू केली. यामुळे बदल होऊ लागला आणि मी हळू हळू स्त्री होऊ लागले.
यादरम्यान एकदा आई-वडील मुंबईला आले. दोघांचंही समुपदेशन झाले. डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर आल्यानंतर वडिलांच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्यांनी रडत रडतच मला मिठी मारल्याचं मॉडेल सांगते.
यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिला 2016 मध्ये इंडियाच्या लीडिंग मॅगजीनमध्ये मॉडेल म्हणून पहिल्यांदाच काम मिळालं होतं. त्यानंतर सावधान इंडियामध्ये ट्रान्स वुमेन मोनाचा लीड रोल मिळाला.
२०१७ मध्ये मिस ट्रांसक्वीन इंडिया ब्यूटी पीजेंटबद्दल कळालं आणि त्याचं ऑडिशन दिलं. या पीजेंटमध्ये सहभागी झाले. त्यांनी मला मिस ट्रांसक्वीनचं ब्रँड एम्बेसडर बनवलं.
नव्या म्हणते, ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा घरी आले तर मला पाहण्यासाठी गावातील लोक जमा झाले होते. गावात नवीन नवरी आल्याप्रमाणे लोकांना बघण्यासाठी रांग लावली होती.