कंडोम नसल्यानं शरीर संबंध ठेवताना तरुणाचा भलताच प्रयोग; दुसऱ्याच दिवशी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 01:07 PM2021-08-25T13:07:20+5:302021-08-25T13:11:32+5:30

कंडोम नसल्यानं केलेला भलताच प्रयोग अंगाशी आला; पोलिसांकडून तपास सुरू

शरीर संबंध ठेवत असताना कंडोम नसल्यानं तरुणानं केलेला भलताच प्रयोग केला. हा प्रयोग तरुणाच्या जीवावर बेतला. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदाबादमध्ये घडलेल्या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. शरीर संबंध ठेवणारे प्रियकर-प्रेयसी अंमली पदार्थांच्या आहारी होते अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली होती.

शरीर संबंधादरम्यान कंडोम नसल्यानं प्रेयसीची गर्भभारणा टाळण्यासाठी प्रियकरानं भलताच प्रयोग केला. तो प्रयोग त्याच्या जीवावर बेतला. सलमान मिर्झा असं मृत तरुणाचं असून तो २५ वर्षांचा होता.

अहमदाबादमधील फतेहवाडी परिसरात राहणारा सलमान जहापुरा येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. हे दोघे अंमली पदार्थांचं सेवन करायचे. शरीर संबंध ठेवण्याआधीही त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं.

शरीर संबंध ठेवण्याआधी आपल्याकडे कंडोम नसल्याचं दोघांच्या लक्षात आलं. त्यामुळे सलमाननं त्याच्या गुप्तांगाला फेव्हिकॉलसारखा चिकट पदार्थ लावण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीची गर्भधारणा टाळण्यासाठी सलमाननं घेतलेला निर्णय त्याच्या जीवावर बेतला.

अंमली पदार्थाचं सेवन करताना किक बसावी यासाठी दोघे त्यांच्याजवळ चिकट पदार्थ ठेवायचे. तोच पदार्थ त्यांनी शरीर संबंध ठेवताना वापरला. यानंतर दुसऱ्या दिवशी अंबर टॉवर परिसरात सलमान बेशुद्धावस्थेत सापडला.

एका ओळखीच्या व्यक्तीनं सलमानला बेशुद्धावस्थेत पाहिलं. त्यानं सलमानला घरी नेलं. त्याची प्रकृती खालावल्यानं त्याला सोला येथील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. फेव्हिकॉलसारखा चिकट द्रव वापरल्यानं सलमानचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सलमानचा विसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती झोन सातचे डीसीपी प्रेमसुख डेलू यांनी दिली.