now going to mars will be easy know how
अंतराळातील थरारक अनुभव; 'या' ठिकाणी तुम्हीही करू शकता मंगळ ग्रहाची सफर By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 02:51 PM2019-09-01T14:51:35+5:302019-09-01T15:00:11+5:30Join usJoin usNext मंगळ ग्रहाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आता पृथ्वीवरच मंगळ ग्रहाची सफर करता येणार आहे. हॉलिडे वेबसाईट ट्रिप अॅडवायजर आणि अॅस्ट्रोलँड कंपनीने पृथ्वीवरच कृत्रिम मंगळ ग्रह तयार केला आहे. पर्यटकांना अंतराळातील थरारक अनुभव घेता येणार आहे पर्यटकांना मंगळ ग्रहाची सफर करण्यासोबतच तेथील अडचणींचा सामना देखील करावा लागणार आहे. स्पेनच्या कॅनाटाब्रियनमधील गुहेमध्ये हे आर्टिफिशियल प्लॅनेट तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना तीन दिवस ही ट्रिप अनुभवता येणार आहे. मंगळ ग्रहावरील सफरीसाठी जवळपास 4.80 लाख रुपये खर्च येतो. मात्र यासाठी तीन आठवडे ऑनलाईन ट्रेनिंग देण्यात येते. मंगळ ग्रहावर पर्यटकांना वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी करता येणार आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सविज्ञानTravel Tipsscience