घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:28 PM 2021-01-28T12:28:36+5:30 2021-01-28T12:46:41+5:30
आता नाद्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या आठ मुलांच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. सर्वच मुले निरोगी आणि फीट आहेत. सगळेच शाळेत जातात आणि आपल्या आईची मदत करतात. आई होणं हा एका महिलेसाठी जगातला सर्वात मोठा आनंद असतो. ९ महिने आपल्या पोटात बाळाला वाढवण्यादरम्यान महिला बाळाच्या जन्माआधीच त्याच्याशी जुळून जाते. पण काही प्रेग्नेन्सी विचित्र कारणांमुळे चर्चेत येतात. २००१ मध्ये अमेरिकेत राहणारी नाद्या सुलेमान तेव्हा चर्चेत आली जेव्हा प्रेग्नेन्सी दरम्यान तिचं पोट प्रमाणातपेक्षा जास्त फुगलं होतं. टेस्ट केल्यावर समोर आलं की, तिच्या पोटात एक-दोन नाही तर पूर्ण आठ बाळ जगत आहेत. त्यानंतर ती चर्चेत आली. आता १२ वर्षानंतर ही आई पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. तिने तिच्या बाळांच्या १२व्या वाढदिवशी लोकांसोबत तिने शेअर केले की, एकत्र इतकी मुले सांभाळताना तिला किती अडचणी आल्या.
४५ वर्षीय नाद्या सुलेमानने आपल्या आठ मुलांच्या वाढदिवसानिमित्ताने एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तिने सांगितले की, सर्वच मुलं जगातले सर्वात केअरिंग आणि समजदार आहे. सगळेच तिची मदत करतात.
नाद्या २००९ मध्ये सर्वातआधी चर्चेत आली होती. तेव्हा ती एकत्र आठ मुलांची आई होणार होती. आधीच ६ मुलांची आई असलेल्या नाद्याने आयव्हीएफच्या माध्यमातून आणखी एका प्रेग्नेन्सीचा प्रयत्न केला होता. पण डॉक्टरांनी तिच्या गर्भात एकत्र १२ भ्रूण ट्रान्सफर केले. यातील आठ बाळांनी जन्म घेतला.
डॉक्टरच्या या चुकीमुळे तिचे डॉक्टर मायकल कमरवा यांचं लायसन्स कॅन्सल झालं होतं. २०१० मध्ये त्यांचं लायसन्स कॅन्सल झालं. सुनावणी दरम्यान डॉक्टरांनी खूप काही कारणे सांगितली. पण कायद्यानुसार, एखाद्या महिलेच्या गर्भात तीनपेक्षा जास्त भ्रूण टाकले जाऊ शकत नाहीत. पण त्याने १२ भ्रूण इम्प्लांट केले होते. डॉक्टर म्हणाला होता की, असं करण्यास नाद्यानेच त्याला सांगितलं होतं.
आता नाद्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या आठ मुलांच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. सर्वच मुले निरोगी आणि फीट आहेत. सगळेच शाळेत जातात आणि आपल्या आईची मदत करतात.
नाद्याने घटस्फोटानंतर आयव्हीएफच्या माध्यमातून बाळ मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तसेच तिने १९९७ मध्येही आयव्हीएफ ट्राय केलं होतं. यासाठी तिने एका अपघातानंतर मिळालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेचा वापर केला होता. आयव्हीएफने तिने आधी सहा बाळांना जन्म दिला. पण २००९ मध्ये एकत्र आठ बाळांना जन्म देऊन ती प्रसिद्ध झाली.
या प्रेग्नेन्सीवर नाद्या म्हणाली होती की, तिला केवळ दोन मुलं पाहिजे होते. पण डॉक्टरने तिला फसवलं. त्याने तिच्या गर्भात एकत्र १२ भ्रूण टाकले. ज्यातील ८ जिवंत राहिलेत. अशाप्रकारे तिने एकत्र आठ बाळांना जन्म दिला. पण आज तिला तिच्या मुलांवर गर्व आहे.
मुलांबाबत नाद्याने सांगितले की, तिचा हा प्रयत्न असतो की, सर्वांचं पालन पोषण चांगलं व्हावं. ती त्यांचे फोटो शेअर करत असते. अशाप्रकारे ही आई एक फार बिझी लाइफ जगत आहे.
नाद्याने सांगितले की, एकत्र १४ मुलांचा सांभाळ एकटीने करणं फार अवघड आहे. तिचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यात जातो. तिचे १४ पैकी १३ मुले वीगन आहेत.
मुलांबाबत नाद्याने सांगितले की, तिचा हा प्रयत्न असतो की, सर्वांचं पालन पोषण चांगलं व्हावं. ती त्यांचे फोटो शेअर करत असते. अशाप्रकारे ही आई एक फार बिझी लाइफ जगत आहे.