प्रेमासाठी काय पण! जगाची पर्वा न करता तरुणींनी दुप्पट, तिप्पट वयाच्या व्यक्तीला केलं जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 10:59 AM2023-01-28T10:59:24+5:302023-01-28T11:09:14+5:30

प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे सांगणाऱ्या काही लव्ह स्टोरीज समोर आल्या असून त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत

कोण, कधी, कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे खरंच सांगता येत नाही. प्रेम आंधळं असतं असंही म्हणतात. प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच समोर येत असतात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे सांगणाऱ्या काही लव्ह स्टोरीज समोर आल्या असून त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तरूणींनी जगाची पर्वा न करता दुप्पट, तिप्पट वयाच्या व्यक्तीला आपलं जोडीदार बनवलं आहे. अशाच काही जोड्यांबद्दल जाणून घेऊया...

उत्तर प्रदेशमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी मंदिरात लग्न केल्याची घटना समोर आली आहे. सासरे कैलाश यादव यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना चार मुले असून पूजाचा नवरा तिसरा मुलगा होता, त्याचाही मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले आहे.

राजस्थानमध्येही अशा लग्नाची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थानमधील एका 83 वर्षीय व्यक्तीने त्याच्यापेक्षा 53 वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी लग्न केले होते. मुलगा हवा या इच्छेसाठी लग्न केल्याचा दावा केला जात आहे.

हरियाणाच्या मेवातमध्ये एका 67 वर्षीय व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी पलवल आणि मेवातच्या पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेऊन मुलीला तिच्या पालकांकडे परत देण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

आसाममधील एका व्यावसायिकाच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. वृत्तानुसार, एका 70 वर्षीय व्यक्तीने 40 वर्षीय महिलेशी लग्न केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांग्लादेशचे मंत्री मुजीबुल हक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी हनुफा अख्तर या त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न केले होते. त्यानंतर वयाच्या 70 व्या वर्षी ते वडीलही झाले.

psycho_biihari नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर वृद्ध व्यक्ती आणि तरुण मुलीच्या लग्नाचा व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. या पोस्टवर युजर्सनी खूप मजेदार कमेंट्स केल्या होत्या.

पाकिस्तानमधील एका अनोख्या लग्नाची बातमीही सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामध्ये 61 वर्षीय व्यक्तीने 18 वर्षीय तरुणीसोबत लग्न केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

इन्स्टाग्रामवर funtaap नावाच्या अकाउंटवरून एक मजेदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वृद्ध वराने सुंदर वधूसोबत लग्न केले आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "काय काय बघावं लागत आहे".

ब्रिटीश वृत्तपत्र द सनच्या मते, 23 वर्षीय ब्राझिलियन नर्सिंग विद्यार्थिनी मारिया एडुआर्डा डायसने 63 वर्षांच्या निक्सन मोटाला डेट करायला सुरुवात केली जेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. आता या जोडप्याने टिकटॉकवर लग्नाची घोषणा केली आहे.