जुन्या रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटून तयार केलं घर; आज आहे कोट्यवधींची किंमत, पाहा सुंदर फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 08:07 PM2021-07-07T20:07:46+5:302021-07-07T20:18:39+5:30

एखाद्या जुन्या रेल्वे स्थानकाचं रुपांतर एका जबरदस्त राहत्या घरात होऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. पुढील फोटोंवरुनच तुम्हाला याची कल्पना येईल...

युकेमध्ये डोंगराळ भागातील एक रेल्वे स्थानकाचं राहत्या घरात रुपांतर केलं आणि ते आता विक्रीसाठी उपलब्ध झालं आहे. युकेच्या डिवोन येथील हे घर आधी एक्स व्हॅली रेल्वेचा एक भाग होतं. या रेल्वे स्थानकाची सुरुवात १ मे १८८५ साली झाली होती.

जुन्या रेल्वे स्थानकाचं आता रुपडं पालटण्यात आलं आहे. छोट्याशा पण तितक्याच सुंदर घराचं मालक होण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.

रेल्वे स्थानक बंद झाल्यानंतर याठिकाणी स्थानकाच्या कार्यालयाचं रुपांतर एका छोट्याशा घरात करण्यात आलं आहे. या घराची किंमत ५.६ कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

१९२३ साली या ठिकाणाहून सर्वात आधी कर्मचाऱ्यांना हटविण्यात आलं. त्यानंतर ४० वर्षानंतर हे रेल्वे स्थानक पूर्णपणे बंद करण्यात आलं. कारण त्यावेळी रेल्वेचं ब्रिटनमध्ये राष्ट्रीयीकरण झालं होतं

रेल्वे स्थानक पूर्णपणे बंद करण्यात आल्यानंतर त्याचं घरात रुपांतरण करण्यात आलं. घराचा दरवाजा अगदी प्लॅटफॉर्मसमोरुनच उघडतो. तर तिकीट काऊंटरचं रुपांतर बेडरुममध्ये करण्यात आलं आहे.

महत्वाची बाब म्हणजे या घराच्या शेजारीच एक छानसं गार्डन देखील आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.

सुट्टीच्या काळात जवळच्या शहरातून नागरिक याठिकाणी पर्यटनासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी देखील येतात. याचाच विचार करुन या ठिकाणी कायमस्वरुपी घर तयार करण्यात आलं आहे.

Read in English