Osho Death Anniversary : ओशो रजनीश यांचा मृत्यू आजही बनून आहे रहस्य, का झाला होता मृत्यूवरून वाद? By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:47 PM 2022-01-19T13:47:42+5:30 2022-01-19T13:53:16+5:30
Osho Death Anniversary : आपल्या जीवनात अनेक वादात सापडलेल्या ओशो यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण हार्ट फेलिअर सांगण्यात आलं होतं. ओशो यांचा मृत्यू एक रहस्य बनून आहे. पुण्यात जेव्हा १९ जानेवारी १९९० ला ओशो रजनीश यांचं निधन झालं तेव्हा जी स्थिती होती, त्यामुळे त्यांच्या निधनाबाबत रहस्य बनलं. मृत्यूचं अधिकृत कारण हृदयाचे ठोके थांबणं होतं. पण त्यांच्या कम्यून द्वारा जारी स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं की, अमेरिकेतील तुरूंगात कथित विष देण्यात आल्यानंतर 'शरीरात राहणं नरक बनलं होतं' त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
ओशो यांच्या समाधीवर लिहिलं आहे की, ‘न कभी जन्मा, न कभी मरा, सिर्फ ११ दिसंबर १९३१ से १९ जनवरी १९९० के बीच इस पृथ्वी ग्रह पर भ्रमण किया’. आपल्या जीवनात अनेक वादात सापडलेल्या ओशो यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण हार्ट फेलिअर सांगण्यात आलं होतं. ओशो यांचा मृत्यू एक रहस्य बनून आहे.
पहिला सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित झाला होता की, जेव्हा आश्रमात अनेक डॉक्टर उपस्थित होते. मग १९ जानेवारी १९९० च्या दुपारी डॉ. गोकुळ गोकनी यांना आश्रमाच्या बाहेरून का बोलवण्यात आलं? डॉक्टर म्हणाले की, ओशो मरत आहेत, मग वेळीच आश्रमातील डॉक्टरला आधी का बोलवण्यात आलं नाही?
२०१५ मध्ये डॉ. गोकनी यांनी एका व्हिडीओतून सांगितलं होतं की, ओशो यांचे पर्सनल डॉक्टर देवराज आणि जयेश यांनी त्यांना अनेक तास रूममध्ये बंद केलं होतं आणि डॉक्टरांना भेटू दिलं नव्हतं. गोकनी यांना मृत्यूचं कारण मायोकार्डियल लिहिण्यास सांगण्यात आलं होतं. जेणेकरून शंका राहू नये. मात्र, 'हू किल्ड ओशो' पुस्तकाचे लेखक अभय वैद्य यांचं मत होतं की, ओशो यांना ड्रग्सच्या ओव्हरडोजच्या माध्यमातून विष देण्यात आलं होतं.
देवराज आणि जयेश यांनी सर्वांनाच हेच सांगितलं होतं की, ओशो यांची इच्छा होती की, मृत्यूनंतर लगेच अंत्य संस्कार करण्यात यावा. यासाठी आश्रमातील सर्वांना अंत्य दर्शनासाठी केवळ १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. घोषणेनंतर १ तासातच ओशो यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. यासाठी इतकी घाई का? या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत नाही.
१९ जानेवारीला जेव्हा ओशो यांची स्थिती बिघडली होती, तेव्हा आश्रमात त्यांची आई उपस्थित होती. त्यांनाही काही सांगण्यात आलं नाही. त्यांनाही मृत्यूची खबर देण्यात आली. ओशोची सेक्रेट्री नीलमने मीडियाला सांगितलं होतं की, 'मी जेव्हा त्यांना सांगितलं की, ओशो यांचं निधन झालं. तर त्या म्हणाल्या होत्या की, नीलम, त्याला मारण्यात आलं'. नीलमने हेही सांगितलं की, 'तेव्हा मी त्यांना म्हणालेही होते की, कुणावर आरोप करण्याची ही योग्य वेळ नाही आहे'.
वैद्य यांच्या पुस्तकातही याचा उल्लेख गंभीरतेने करण्यात आला की, ओशो यांच्या मृत्यूच्या ४१ दिवसांआधी त्यांची कथित एक्स प्रेयसी आणि ओशो यांची केअरटेकर आई प्रेम निर्वाणो यांचा मृत्यू कोणत्या स्थितीत झाला होता. ४० वर्षीय आई प्रेमचं आरोग्य पूर्णपणे ठीक होतं. पुस्तकानुसार त्यांचा अंत्य संस्कारही काही लोकांमध्ये लवकर झाला होता.
जयेशच्या नियंत्रणातील ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनने २०१३ मध्ये ओशो यांचं मृत्यूपत्र एका यूरोपीय कोर्टासमोर सादर करून त्यांच्या पूर्ण प्रॉपर्टीवर दावा केला होता. हे तेच लोक होते ज्यांनी २३ वर्षाआधी ओशो यांच्या मृत्यूवेळी कोणत्याही प्रकारचं मृत्यूपत्र नसल्याचा दावा केला होता. नंतर फॉरेन्सिक चौकशीत सादर करण्यात आलेलं मृत्यूपत्र खोटं आढळलं आणि केस परत घेतली गेली. याच कारणांमुळे ओशो यांचा मृत्यू आजही रहस्य बनून आहे.