मालकाला आवडले कर्मचाऱ्याचे काम, केवळ ७५ रुपयांत तिला विकलं दुकान By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:58 PM 2021-07-12T20:58:15+5:30 2021-07-12T21:09:03+5:30
Jara hatke News: आपली कंपनी किंवा दुकान चालवण्यासाठी मालकवर्ग हा कर्मचाऱ्यांना नियुक्त करतो. त्यांना पगार देतो. मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याचा कामावर खूश होऊन कुठल्याही मालकाने केवळ ७५ रुपयांना आपले दुकान त्या मालकाला विकल्याचे तुम्ही ऐकलंय का? आपली कंपनी किंवा दुकान चालवण्यासाठी मालकवर्ग हा कर्मचाऱ्यांना नियुक्त करतो. त्यांना पगार देतो. मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याचा कामावर खूश होऊन कुठल्याही मालकाने केवळ ७५ रुपयांना आपले दुकान त्या मालकाला विकल्याचे तुम्ही ऐकलंय का?
ही बाब खरी वाटत नसली तरी ती खरी आहे. अमेरिकेमध्ये अशी घटना घडली आहे. येथे एका सलूनचालकाने आपल्याच दुकानात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला संपूर्ण दुकान केवळ १ डॉलर म्हणजे केवळ ७५ रुपयांना विकले आहे.
या सलूनचे मालक पियो इम्पेरती यांनी त्यांच्या सलूनमध्ये काम करणाऱ्या हेअर स्टायलिश केथी मोरा हिला केवळ १ डॉलरमध्ये आपले दुकान विकले आहे. योगायोगाची बाब म्हणजे केथी मोरा हिला तिचे कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा याच सलूनच्या मालकांनी काम दिले होते.
पियो इम्पेरती यांनी सांगितले की, केथी मोरा हिच्या चांगल्या कामाने मला प्रभावित केले होते. ती एच उत्तम कर्मचारी आहे. ती खूप चांगली आहे. याबाबत एपीने दिलेल्या वृत्तानुसार दुकान विकण्याबाबत मालकाने सांगितले की, केथी मोरासोबतची मैत्री कायम राहावी म्हणून, त्यांनी आपले इटली हेअर स्टुडिओ दुकान केवळ १ डॉलरला विकले.
मात्र यादरम्यान, मोरा ही पियो इम्पेरती यांना दुकानाचे भाडे देणार आहे. मात्र हे दुकान केवळ १ डॉलरमध्ये मिळाल्याने दुकानातील उपकरणे, वापरली जाणारी प्रसाधने आणि ग्राहकांसाठी सलून खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या हजारो डॉलरची बचत झाली आहे. ७९ वर्षीय इम्पेरती आता इथे केवळ एक स्वतंत्र ठेकेदार म्हणून काम करत आहेत.
दुकानाची मालकीण बनल्यानंतर कैथी मोरा हिने सांगितले की, माझे स्वप्न होते की, मी एक दिवस स्वत:चा सलून सुरू करण्यामध्ये सक्षम बनेन, माझे हे स्वप्न आता साकार झाले आहे. वृत्तपत्रामधील वृत्तानुसार पियो इम्पेरती यांनी १९६५ मध्ये एका सलूच्या माध्यमातून विविध ठिकाणी सुमारे ५६ वर्षे व्यवसाय केला आहे.
मालकाकडून दुकान मिळाल्यानंतर ३२ वर्षीय मोरा हिने जुनी आठवण सांगितली. ती म्हणाली की, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुणीही मला कामावर ठेवण्यास इच्छुक नव्हता. तेव्हा मी एका शिक्षिकेकडे मदत मागितली. त्यानंतर इम्पेरतींचा फोन नंबर मिळाला. इम्पेरती आणि त्यांच्या पत्नीने माझी परीक्षा घेतली आणि अखेरीच कामावर ठेवले.
मोरा हिने इम्पेरतींबाबत सांगितले की, आम्ही एका कुटुंबाप्रमाणे राहिलो. इम्पेरती हे सलूनमध्ये येणाऱ्या सर्व लोकांसोबत समान व्यवहार करायचे. कुठलीही व्यक्ती जी काम करते ती यशस्वी व्हावी, जीवनात काहीतरी बनावी, अशी इम्पेरती यांची अपेक्षा असते.