Palace found in Israel: इस्रायलमध्ये मोठा शोध; संशोधकांना सापडला जमिनीत गाडला गेलेला 1200 वर्षे जुना महाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 04:21 PM2022-08-31T16:21:33+5:302022-08-31T16:25:28+5:30

Palace found in Israel: संशोधकांना इस्रायलच्या दक्षिणेकडील वाळवंटात एक 1200 वर्षे जुना महाल सापडला आहे. या महालाची भव्यता पाहून संशोधक चकीत झाले.

1200 Years Old Luxurious Palace: पृथ्वीवर अनेक ठिकाणी विविध पुरातन वास्तू आढळलात. सोशल मीडियावर अशाच एका पुरातन वास्तूचा(Archaeological Site) फोटो व्हायरल होत आहे. हे फोटोज इस्रायलच्या दक्षिणेकडील एका वाळवंटातील आहेत, जिथे पुरातत्व विभागाला वाळूच्या आत गाडला गेलेला एक महाल सापडला आहे. या शोधामुळे शोधकर्त्यांना त्या काळातील लोकांबद्दल अधिक माहिती मिळू शकते.

बेडूइन शहरात सापडला महाल- इस्रायलच्या बेदुइन शहरात सापडलेला हा 1200 वर्ष जुना महाल अतिशय आलिशान आहे. याच्या आत मोठे अंगण आणि अनेक खोल्या आहेत. दगडाने बांधलेल्या या महालाच्या भिंतीवर सुंदर चित्रे बनवण्यात आली असून काही भागात संगमरवराचाही वापर करण्यात आला आहे.

महालात पाण्याचा तलाव- बेदुइन शहरात सापडलेला हा राजवाडा 8व्या किंवा 9व्या शतकातील असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. शोधादरम्यान पुरातत्व विभागाला या महालात काही काचेच्या भांड्यांचे अवशेषही सापडले. राजवाड्याच्या आत स्वच्छ पाण्याचा एक तलावदेखील सापडला आहे. याची खास गोष्ट म्हणजे महालातील प्रत्येक खोलीचा दरावाजा तलावाच्या दिशेने उघडतो.

भूमिगत खोल्या चकित करतील- महालाच्या भव्यतेने शोधकर्ते आधीच आश्चर्यचकित झाले होते की राजवाड्यात सापडलेल्या भूमिगत खोल्या पाहून ते आणखी चकित झाले. त्यांचा असा विश्वास आहे की, या खोल्या वाळवंटातील थंडीपासून वाचण्यासाठी बांधले असावेत. महालाच्या आतील खोल्या अगदी पक्क्या आहेत. संशोधकांनी सांगितले की, राजवाड्याची रचना बघून असे वाटते की, त्यात राहणारे लोक खूप श्रीमंत आणि संपन्न असावेत.