people take selfie on railway track
म्हणून या रेल्वे ट्रॅकवर लोक जीव धोक्यात घालून घेतात सेल्फी By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 08:58 PM2018-11-19T20:58:43+5:302018-11-19T21:13:06+5:30Join usJoin usNext अत्याधुनिक मोबाइल फोन हाती आल्याने आजकाल सेल्फी काढण्याचे फॅड वाढले आहे. सेल्फीसाठी लोक जीव धोक्यातही घालतात. असाच एक रेल्वे ट्रॅक सध्या टुरिस्ट स्पॉट बनल आहे जिथे लोक सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत. हा रेल्वे ट्रॅक व्हिएतनाममधील हनोई येथे असून, बऱ्याच जुन्या असलेल्या या रेल्वे ट्रॅकवरून आजही ट्रेनची ये जा सुरू असते. तरीही इथे सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. येथे मागून रेल्वे येत असताना सेल्फी काढण्याचा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी पर्यटक ट्रॅकवर गर्दी करतात हा रेल्वे ट्रॅक फ्रान्स वसाहतवाद्यांनी मालाची ने आण करण्यासाठी बांधला होता. मात्र आजही येथून ट्रेनची वाहतूक सुरू असते आणि ट्रेनची ये जा सुरू असताना फोटो, सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यांमध्ये या ट्रॅकचे नुकसान झाले होते. येथे ट्रेन आल्यावर सर्वजण ट्रॅक सोडून बाजूला होतात आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी घाई करतात. टॅग्स :जरा हटकेआंतरराष्ट्रीयJara hatkeInternational