कुत्रा चालवतो सायकल, खारूताई पितेय ज्यूस, बघा 'ही' प्राण्यांची भलतीच हौस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 17:23 IST2020-03-06T16:59:56+5:302020-03-06T17:23:34+5:30

अनेकदा आपण पाळीव प्राण्यांना हट-हट करून हालकून देतो. खूप कमी लोक असे आहेत. त्यांना प्राण्याची खूप आवड असते. जर जास्त आवडले असतील तर आपण त्या प्राण्यांसोबत सेल्फी काढतो. आज आम्ही तुम्हाला असे फोटो दाखवणार आहोत. जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे फोटो तुम्हाला नक्कीच विचार करण्यासाठी प्रवृत्त करतील.

या फोटोतून खूप शिकण्याासारखं आहे. एक मित्र बाकिच्या मित्रांची मदत करताना दिसून येत आहे.

आपल्या योगा, व्यायाम करायला अनेकदा कंटाळा येतो. पण हा कुत्रा योगा करण्याच्या तयारीत दिसून येत आहे.

खारूताईला ज्यूस पिण्याची भारी हौस ही खारूताई ज्यूस स्ट्रॉने पित आहे.

बापरे हे काय! चक्क मॅट घालून कुत्रा आपल्या शरीराची स्ट्रेचिंग करतोय.

एका छताखाली दोघंजणं एकमेकांंचा बचाव करत आहेत.

बाबो! कुत्रा पण ड्रायव्हर झालाय, सायकल चालवत कुठे चाल्लाय बघा