pictures of animal amputees who walk again
माणसांप्रमाणेच प्राण्यांवरदेखील केले जातात 'असे' उपचार By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 03:23 PM2018-05-13T15:23:04+5:302018-05-13T15:23:04+5:30Join usJoin usNext तुर्कस्तानच्या इस्तांबूलमध्ये एका खारीवर उपचार करण्यात आले. या खारीला चालता येत नव्हतं. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्राझीलच्या सोरोकाबा प्राणीसंग्रहालयातील एका फ्लेमिंगोच्या पायाचं हाड मोडलं. त्याच्या पायावर तेथील डॉक्टरांनी उपचार केले. आठ महिन्यांची मांजर नवव्या मजल्यावर पाचव्या मजल्यावर पडल्यानं तिचे मागचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे मांजराला चालता येणं शक्य होतं नव्हतं. त्यामुळे तिच्या शरीराच्या मागच्या भागाला, पायांजवळ दोन चाकं लावण्यात आली. व्हर्जिनियातील अँजेल मेरी या तीन वर्षीय घोडीचा पुढील एक पाय निकामी झाला. त्यामुळे तिच्यावर उपचार करुन कृत्रिम पाय बसवण्यात आले. यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या होप नावाच्या कुत्र्याच्या पुढील पायाजवळ चाक लावण्यात आलं आहे. पायामध्ये ताकद असल्यानं होपसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. टॅग्स :जरा हटकेJara hatke